आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • India's Response To China's Claim To The Galvan Valley, 'This Exaggerated Statement Is Against The June 6 Agreement'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन सीमा वाद:गलवान खोऱ्यातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांची मेजर जनरल लेव्हलची चर्चा सुरू

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लेझियन म्हणाले होते की, गलवान खोऱ्याची सार्वभौमत्ता ही नेहमीच चीनच्याच भागात होती
  • भारताच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तवने सांगितले की, 6 जून रोजी कमांडर स्तरावरील चर्चेत परिस्थिती जबाबदारीने हाताळण्याचा करार झाला होता.

सोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यातील लष्करी चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये मेजर जनरल स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी बुधवारी दोन्ही देशांमध्ये मेजर जनरल पातळीवर चर्चा झाली. मात्र त्या चर्चेचा काहीच निष्कर्ष निघाला नव्हता. 

दरम्यान भारताने बुधवारी रात्री उशीरा पुन्हा एकदा गलवान खोऱ्यावरील चीनचा दावा फेटाळून लावला. विदेश मंत्रालयाने म्हटले की, दोन्ही देशांमध्ये 6 जूनला कमांडर स्तरच्या छालेल्या चर्चेत परिस्थिती जबाबदारीने हाताळण्याचा करार झाला होता. आता अतिशयोक्तीपूर्ण केले जाणारे विधान 6 जून रोजी झालेल्या कराराच्या विरुद्ध आहेत. 

खरंतरं लद्दाख येथील गलवान खोऱ्याच्या वादावरुन भारत आणि चीनमध्ये तणावाची परिस्थिती आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता बुधवारी संध्याकाळी म्हणाले होते की, गलवान खोरे क्षेत्रातील सार्वभौमत्ता नेहमी चीनचीच असेल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, आम्ही यापूर्वी म्हटल्याप्रमाणे, बुधवारी संध्याकाळी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी लडाखच्या सद्यस्थितीबद्दल फोनवर चर्चा केली. ही परिस्थिती जबाबदार पद्धतीने हाताळली जावी, यावरही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली आहे.

गलवानमधील सर्वसाधारण स्तरावरील चर्चा अनिश्चित होती, परराष्ट्र मंत्र्यांचेही बोलणे झाले 

दोन्ही देशांमधील तणावानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची फोनवर चर्चा झाली. तत्पूर्वी, जयशंकर म्हणाले की, सीमेवर घडलेल्या घटनेचा द्विपक्षीय संबंधांवर खोलवर परिणाम होईल. चीनने आपल्या हालचालींचे पुन्हा मूल्यांकन करून पावले उचलणे ही काळाची गरज आहे. दोन्हीही पक्षांनी सर्वप्रथम कराराचा आदर करावा आणि एकतर्फी कारवाई करु नये.

यापूर्वी दोन्ही देशांमध्ये मेजर जनरल स्तरावर चर्चा झाली. न्यूज एजन्सी एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की या संभाषणाचा काहीच निष्कर्ष निघाला नाही. गलवानमध्ये परिस्थिती जशीच्या तशीच आहे. येत्या काही दिवसात दोन्ही बाजूंकडून पुढील चर्चा होईल.

चीनच्या कमांडिंग ऑफिसरसह 40 सैनिक ठार झाले
गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक चकमकीत भारताचे 20 सैनिक शहीद झाले. 40 चिनी सैनिकही मारले गेले आहेत. यामध्ये युनिटच्या कमांडिंग ऑफिसरचा समावेश आहे. ज्या चिनी यूनिटने भारतीय जवानांवर हल्ला केला त्याच यूनिटचा हा अधिकारी होता. याच गलवान कोऱ्यात 1962 मधील चकीमकीत 33 भारतीयांनी जीव गमावला होता. 

बातम्या आणखी आहेत...