आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात रेटा:पोट भरण्यासाठी भारताचा गहू आवश्यक, सरकारने धोरणाचा आढावा घ्यावा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानची स्थिती रसातळाला गेली आहे. महागाई २९% आहे. पिठासारख्या जीवानावश्यक बाबी संकटात आहेत. खराब आर्थिक स्थितीमुळे आयएमएफने कर्ज देण्यास खडतर अटी लादल्या आहेत. यादरम्यान, पाकिस्तानी व्यावसायिक, उद्योगपती आणि चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सदस्यांनी भारतासोबतचा व्यापार पुनर्स्थापित केला जावा,अशी विनंती शाहबाज सरकारकडे केली आहे. हीच काळाची गरज आहे. सदस्यांच्या म्हणण्यानुसार, देशातील दुर्गम क्षेत्रांत गरीबांचे पोट भरायचे असेल तर गहू मागवला पाहिजे. पाकिस्तानचे राजकीय आणि कूटनीतीच्या पातळीवर भारतासोबत चांगले संबंध नाहीत. भारताच्या गव्हापासून संकटांतून बाहेर पडण्यास मदत मिळेल.

इस्लामाबाद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्यवाह अध्यक्ष फहद हुसेन यांनी भास्करला सांगितले की, पाकिस्तानच्या गहू उत्पादनावर विनाशकारी पुरामुळे परिणाम झाला आहे. अशात भारतासह शेजारी देशांकडून गहू आयात करून संकटाशी तोंड देता येईल. फहाद म्हणाले, देशात सामान्य नागरिकाची कमाई एवढी नाही की, ते पिठासारख्या वस्तूही खरेदी करू शकत नाहीत. हे त्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. फहाद म्हणाले,आम्ही इस्लामाबादच्या स्तरावर संकट दूर केले आहे. सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानसारख्या दूर्गम प्रांतात पिठाचे संकट कायम आहे. वाईट काळात शेजाऱ्याची मदत घेण्यासाठी सरकारने पुढे आले पाहिजे.

पाकिस्तानात पिठावरून हिंसक आंदोलन इतिहासातील सर्वात मोठे खाद्य संकट सुरू पाकिस्तानातील इतिहासातील सर्वात मोठे खाद्य संकट आहे. पंजाब, खैबर पख्तुनख्वा, सिंध आणि बलुचिस्तान राज्यांत १० किलो गहू ३००० पाकिस्तानी रुपयांत विकला जात आहे. पिठाच्या टंचाईमुळे हिंसक आंदोलन झाले. लोक गव्हाच्या पोत्यासाठी भांडत आहेत.

सरकार-सरकारमध्ये गव्हाचा करार व्हावा आयात धोरणातील त्रुटीमुळे पिठाचे भाव वाढत आहेत. यामुळे किमती गगनाला भिडल्या आहेत. कृषी तज्ज्ञ अमजिद हुसेन म्हणाले,भारताने खासगी निर्यातीवर बंदी घातली आहे. सरकार- सरकारचा करार सुरू आहे. बांगलादेश, श्रीलंका व मालदीवला भारताचा गहू मिळत आहे.

२५ लाख टन गहू हवा, अन्यथा विक्राळ स्थिती हुसेन म्हणाले, गहू नियमनही असले पाहिजे. खासगी क्षेत्रातून ३७ लाख टन आणि सार्वजनिक क्षेत्रातून सरकार ९८ लाख टनापर्यंत गहू खरेदी करावा. सध्याच्या स्थितीत २५ लाख टन गहू मागवावा लागेल. अशात भारत सर्वात चांगला राहील. तसे न झाल्यास संकट विक्राळ रूप घेईल.

इम्रान खान यांच्या काळात साठेबाजी गव्हाचे संकट इम्रान खान यांच्या पीटीआय सरकारच्या कार्यकाळादरम्यान सुरू झाले. तेव्हा साठेबाज आणि मध्यस्थांनी किमती वाढवण्यासाठी साठा केला हेाता. अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करीतून गहू बाजारातून गायब झाला होता.

बातम्या आणखी आहेत...