आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:डाेनाल्ड ट्रम्प यांच्याविराेधात आजपासून महाभियाेग; सिनेटला हवीये जलदगतीने सुनावणी

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निकाेलस फंदाेस / चार्ली सावेज
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्याविराेधातील महाभियाेगाची सुनावणी मंगळवारपासून सुरू हाेणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर करावी, असे सिनेटला वाटते. ६ जानेवारी राेजी संसदेबाहेर झालेल्या हिंसाचारासाठी ट्रम्प यांनी समर्थकांना चिथावणी दिली हाेती. त्याबद्दल त्यांना दाेषी ठरवावे किंवा नाही, हे सिनेटला ठरवावे लागेल. वास्तविक महाभियाेगाचा उद्देश ट्रम्प यांना या घटनाक्रमासाठी जबाबदार ठरवणे असा आहे. त्यासाठी कॅपिटल हिलवर तेव्हा असलेल्या सशस्त्र दंगलखाेरांच्या व्हिडिओ क्लिपदेखील सादर करण्याची तयारी आहे. पदावर असताना दुसऱ्यांदा महाभियाेगाला ताेंड देणारे ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत. परंतु डेमाेक्रॅटिकला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी विराेधी रिपब्लिकनच्या १७ मतांची गरज भासू शकते. बायडेन यांना अधिकृतपणे अध्यक्ष करण्यापासून राेखण्यासाठी दंगल घडवली गेली. या हल्ल्याची वेदनादायी छायाचित्रे जारी करण्यात यावी, असा डेमाेक्रॅटिकचा प्रयत्न असेल. सिनेटचे प्रमुख नेते चार्ल्स शूमर व अल्पसंख्याक नेता मिच मॅककाेनेल यांना अजूनही सुनावणीबाबत एक करार केला पाहिजे, असे वाटते.

बलाबल असे : महाभियाेगाबाबत सुनावणीसाठी सिनेटमध्ये दाेन तृतीयांश मतांची गरज भासेल. सध्या १०० सदस्यीय सिनेटमध्ये डेमाेक्रॅटिक व रिपब्लिकनचे प्रत्येकी ५० सदस्य आहेत. बहुमतासाठी किमान १७ रिपब्लिकन खासदारांच्या पाठिंब्याची गरज असेल.

ट्रम्प यांचा जबाबासाठी येण्यास नकार
सभागृहात महाभियाेग प्रक्रियेच्या व्यवस्थापकांनी माजी अध्यक्ष ट्रम्प यांना सुनावणीसाठी हजर राहण्याची सूचना दिली आहे. परंतु ट्रम्प यांची बाजू मांडणारे वकील डेव्हिड स्काेन यांनी ते जबाब देण्यासाठी येऊ शकणार नाहीत, असे स्पष्ट केले. प्रमुख व्यवस्थापक जॅमी रस्कीन यांनी ट्रम्प यांना पत्र पाठवून सुनावणीदरम्यान किंवा आधी जबाब देण्याची सूचना केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...