आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनजवळील मेट्रो स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. दरम्यान, सदरील घटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर मंगळवारी सकाळी हे मुख्यालय बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे पेंटागॉन क्षेत्र सील केल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
दरम्यान, आम्ही लोकांना घराबाहेर पडू नका अशी विनंती करीत होतो असे पेंटागॉनने सोशल मीडियावर सांगितले. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो बस प्लॅटफॉर्मजवळ गोळीबाराच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
घटनेनंतर PFPA अलर्टवर
पेंटागॉनच्या घटनेनंतर काही वेळातच पेंटागन फोर्स प्रोटेक्शन एजन्सीला (पीएफपीए) अलर्टवर पाठवण्यात आले. पोलिसांकडून संपूर्ण भागात शोधमोहीम सुरु असून सध्यातरी बंदूकधारीला अटक करण्यात आली नसल्याचे प्रसारमाध्यमांच्या माहितीतून समोर येत आहे. घटनेदरम्यान, अनेक वेळा गोळीबाराचे आवाज ऐकले असल्याचे एपीच्या पत्रकाराने म्हटले आहे.
गेल्या वर्षी झाला होता चाकू हल्ला
पेंटागॉन मेट्रो स्टेशनजवळ गेल्या वर्षी मार्च महिन्यात बंद करण्यात आला होता. यावेळी एका व्यक्तीने चाकूचा वार करत हत्या केली होती. त्यामुळे याठिकाणी बंद पुकारण्यात आले असून त्यानंतर दुपारी अडीच वाजता परत याला खुले केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.