आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • Indiscriminate Use Of Fentanyl In Lockdown, 1 Million Deaths From Painkiller Overdose In US, 30% Higher

कोरोनाकाळाचा साइड इफेक्ट:लॉकडाऊनमध्ये फेंटानिलचा अंदाधुंद वापर, अमेरिकेत पेनकिलरच्या ओव्हरडोसने 1 लाख मृत्यू, तुलनेने 30% जास्त

रॉनी कॅरियन रॉबिन17 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

लॉकडाऊनच्या काळात कोरोनापासून बचावासाठी अमेरिकन नागरिकांनी पेनकिलरचा जास्त वापर केला. मे २०२० ते एप्रिल २०२१ या काळात पेनकिलर अतिप्रमाणात घेण्यात आल्याने एक लाख अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. अमेरिकन संस्था सीडीसीकडून एक अहवाल जाहीर करण्यात आला होता.

त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत पेनकिलरचे अतिसेवन केल्याने मृत्यूच्या प्रमाणात ३० टक्के वाढ झाली आहे. पाच वर्षांच्या काळात आकडेवारी दुप्पट झाली आहे. आैषधाच्या अति वापरामुळे झालेल्या साइड इफेक्टच्या रूपाने ही गोष्ट समोर आली आहे. कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत पावणेआठ लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

मे २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत सुमारे पाच लाख जणांचा मृत्यू झाला. सीडीसीनुसार एक लाखापैकी सर्वाधिक ६४ हजार मृत्यू सिंथेटिक पेनकिलर फेंटानिलमुळे झाले आहेत. फेंटानिल मार्फिनपेक्षा सुमारे १०० पट वेगवान आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग विभागाचे डॉ. नोरा वोलकॉव म्हणाले, महामारीदरम्यान लोकांनी पेनकिलर खूप मोठ्या प्रमाणात वापरल्याने नुकसान झाले.

जीवघेणे फेंटानिल औषध एक किलोच्या पाकिटात

 • जीवघेणे फेंटानिल औषध चीन व भारतातून एक किलोच्या पाकिटातून आयात केले जाते.
 • सोशल मीडिया अॅप स्नॅपचॅटवरून फेंटानिल पुरवठ्याची प्रकरणे समोर आली.
 • फेंटानिल पावडरवर दाब टाकून त्याचे रूपांतर गोळ्यांमध्ये केले जाते.
 • औषधी नियंत्रक डॉ. राहुल गुप्ता म्हणाले, नॅलोक्सिनची कमतरता आहे.
 • कोरोना पॅकेजच्या रूपाने बायडेन यांनी ४ अब्ज डॉलरची घोषणा, परंतु पूर्ण लागू नाही.

ब्रिटन : अँटिबायोटिकविरोधीसंसर्गाचा धोका वाढला

ब्रिटन आरोग्य सुरक्षा संस्थेचे अध्यक्ष सुजन हापकिन्स यांनी इशारा दिला आहे. कोरोनानंतर अँटिबायोटिक प्रतिबंधकामुळे दडलेल्या संसर्गाचाही धोका वाढला आहे. ते म्हणाले, कोरोनाकाळादरम्यान अँटिबायोटिकचा सर्वाधिक वापर झाला. अजूनही सामान्य सर्दीतही अँटिबायोटिक दिले जात आहे. मृतांमध्ये ७० % २५ ते ५४ वयोगटातील

भारत, चीनमध्ये उत्पादित फेंटानिलची मेक्सिकोमार्गे अमेरिकेत विक्री

 • केरोलिनामध्ये ११ महिन्यांच्या मुलीचा फेंटानिल ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला आहे. तिच्या आई-वडिलांवर खटला सुरू आहे. लॉस एंजलिसमध्ये एक किशोरवयीनाला जिवाला मुकावे लागले.
 • ऑनलाइन व सोशल मीडियावर बनावट प्रिस्क्रिप्शनने औषधांची विक्री केली जाते. दोन महिन्यांत डीईएने ८०० जणांना अटक करून १८ लाख फेंटानिल पाकिटे जप्त केली. त्याची उपलब्धता जास्त होती.
 • औषध विभागाच्या प्रशासक अॅनी मिलग्रेम म्हणाल्या, ड्रग ओव्हरडोस राष्ट्रीय आपत्तीसमान आहे. तपास संस्थेने फेंटानिल जप्त केले. त्यामुळे ३३ कोटी लोकांचा मृत्यू झाला असता.
बातम्या आणखी आहेत...