आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Indo China Border Dispute : Mike Pompeo Claim That People's Liberation Army (PLA) Deoployemt On Northern Border

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन सीमावादावर अमेरिकेचा दावा:एलएसीवर 60 हजार चीनी सैनिक तैनात, अमेरिकेचे एनएसए म्हणाले - आता चीनशी चर्चा करण्याचा काही उपयोग नाही

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लडाखमध्ये भारत-चीनचे सैन्यातील तणावादरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी मोठा दावा केला आहे. चीनने लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (LAC) वर 60 हजार सैनिक तैनात केल्याचे पोम्पियो यांचे म्हणणे आहे. पोम्पियो यांनी चीनची वागणुक आणि यामुळे इंडो-पॅसिफिक देशांच्या समुहासाठी (क्वाड) दिसत असलेल्या धोक्यांबाबत चीनचे कान टोचले.

दुसरीकडे अमेरिकेचे एनएसए रॉबर्ट ओ’ब्रायन यांनी म्हटले की, आता चीनसोबत चर्चा करून काही फायदा होणार नाही. कारण चीन आपली आक्रमक वृत्ती बदलणार नाही आणि आपण हे स्वीकारले पाहिजे.

टोकियोमध्ये अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया-क्वाड ग्रुप, इंडो-पॅसिफिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतून परत आल्यानंतर पॉम्पीओने शुक्रवारी एका मुलाखतीत चीनवर निशाणा साधला. क्वाडच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर देखील सहभागी झाले होते.

अमेरिकन एनएसएने देखील असेक वक्तव्य केले

अमेरिकेचे एनएसए रॉबर्ट ओब्रायन यांनी यूटामध्ये म्हटले आहे की चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या भारतीय सीमेवरील विस्तारित आक्रमकता स्पष्टपणे दिसून येते. येथे चीन ताकदीच्या आधारे एलएसीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान चीनवर लक्ष ठेवणे किंवा नरमाईने वागण्याचा काहीही फायदा होणार नाही. आम्ही हे बर्‍याच दिवसांपासून करत आहोत, असेही ते म्हणाले.

भारत आणि चीनमध्ये 5 महिन्यांपासून वाद सुरू आहे

  • 5 मे रोजी पूर्व लडाखमध्ये 200 सैनिक समोरासमोर आले होते.
  • 9 मे रोजी उत्तर सिक्किममध्ये 150 सैनिकांमध्ये चकमक झाली होती.
  • 9 मे रोजी लडाखमध्ये चीनने एलएसीवर हेलिकॉप्टर पाठवले.
  • भारत-चीन मध्ये 15 जून रोजी गलवानमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यात चीनचे 40 सैनिक देखील मारले गेले होते मात्र चीनने ते मान्य केले नाही.
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser