आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलएसी:घुसखोरी करणाऱ्या 200 चिनी सैनिकांना पिटाळून लावले, आता अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सैन्यादरम्यान संघर्ष

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. कांती बाजपेयी चिनी रणनीती व परराष्ट्र संबंध तज्ज्ञ

पूर्व लडाखमध्ये दीड वर्षापेक्षा जास्त काळापासून तणाव सुरू असतानाच अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याच्या कुरापती उजेडात आल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत व चीनचे सैनिक गेल्या आठवड्यात आमने-सामने आले हाेते. सध्याच्या प्राेटाेकाॅलनुसार दाेन स्थानिक कमांडर यांच्यातील चर्चेनंतर चिनी सैनिकांनी पलायन केले. सीमावाद साेडवण्यासाठी ३-४ दिवसांत कमांडर स्तरीय १३ वी बैठक हाेण्याची शक्यता आहे. अजून त्याची तारीख निश्चित झालेली नाही.

अरुणाचल प्रदेशात नियंत्रण रेषेवर चीनचे सुमारे २०० सैनिक तिबेटच्या दिशेने भारतीय सीमेत घुसले हाेते. काही चिनी सैनिकांना ताब्यात घेण्यात आले. चिनी सैनिक मागे हटण्याच्या आधी भारतीय सैनिकांशी त्यांचा सामना झाला. या घटनेत भारतीय सुरक्षा दलाची हानी झाली नाही. अरुणाचलमध्ये धुमश्चक्रीची घटना दीर्घकाळानंतर घडली आहे. पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी मेपासून चीन व भारताचे सैन्य आमने-सामने आले आहे.

चीनची अरुणाचलमध्ये सातत्याने घुसखोरी
सुमारे ९ महिन्यांपूर्वी चिनी सैनिकांनी अरुणाचलमध्ये भारताच्या सीमेपासून साडेचार किमी अातमध्ये गाव वसवल्याचे सांगण्यात आले. हे गाव सुबनसिरी जिल्ह्यात सारी चु नदीच्या किनारी आहे. चीनच्या १०० सैनिकांनी ३० आॅगस्ट राेजी उत्तराखंडच्या बाराहाेती सेक्टरमध्ये घुसखाेरी केली आणि तीन तास तेथे राहिल्यानंतर ते परतले. अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या भागात चीन मोठ्या प्रमाणात बांधकामे करू लागला आहे. त्यात ब्रह्मपुत्र नदीवर अनेक मोठे जलविद्युत प्रकल्पांचाही समावेश आहे.

चीन आर्थिक शक्तीच्या जोरावर भारतालाकमी लेखताे, भारताने या खेळात धूळ चारावी सामरिक पातळीवर चीनच्या कुरापती वाढत चालल्या आहेत. या आक्रमकतेमागे सैन्य नव्हे तर चीनची आर्थिक आघाडी कारणीभूत ठरते. चीनचे अंतर्गत विषय व आंतरराष्ट्रीय संबंधांचे तज्ज्ञ तसेच सिंगापूर विद्यापीठातील ली कुआन यू स्कूल आॅफ पब्लिक पाॅलिसीचे एशिया अँड ग्लाेबलायझेशन विभागाचे संचालक डाॅ. कांती वाजपेयी म्हणाले, चीन स्वत: ला प्रचंड शक्तिशाली समजतो. भारतासमाेर झुकण्याची गरज नाही, असे चीनला वाटते. ‘इंडिया व्हर्सेस चायना : व्हाय दे आर नाॅट फ्रेंड्स’ या अलीकडे प्रकाशित झालेल्या पुस्तकात वाजपेयींनी या मुद्यावर चर्चा केली आहे. दैनिक भास्करचे रितेश शुक्ल यांच्याशी त्यांनी उभय देशांच्या संबंधावर सविस्तर चर्चा केली.

भास्कर एक्सपर्ट : डॉ. कांती बाजपेयी चिनी रणनीती व परराष्ट्र संबंध तज्ज्ञ

चीन भारताबद्दल आक्रमक का आहे?
चीन-भारत यांच्यात विश्वासाचा अभाव आहे. आपली व प्रतिस्पर्ध्याच्या शक्ती व कमकुवत गाेष्टींचा अंदाज बांधणे भारतासाठी आवश्यक आहे. जगातील क्रमांक एकचा देश हाेण्याचे स्वप्न साकारत असल्याचे चीनला वाटते. मदत मागणाऱ्यांसाठी विनम्र व बराेबरी करणारे सहन न हाेणारा देश आहे. आर्थिक आघाडीवर आपण मागे असल्याची भारताला जाणीव आहे. भारताला हे अंतर लवकर कमी करावे लागेल. त्यांना या खेळात धूर चारावी लागेल.

चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा पाच पट जास्त माेठी आहे. पण पुस्तकातून तुम्ही सात पट असल्याचा दावा का केला?
शक्तीचे प्रमुख तीन मापदंड असतात. पहिली अर्थव्यवस्था. चीनचे सैन्य भारताच्या १.२ पट जास्त आहे. चीनचे साॅफ्टवेअर पाॅवरही भारताहून १.२ पट जास्त आहे. तीनही गाेष्टींची गाेळाबेरीज केल्यास शक्तीमधील अंतर ७.४ पट जास्त हाेते. भविष्यात हे अंतर वाढतच जाणार आहे.

दाेन्ही शेजारी देश असूनही शक्तीत एवढे अंतर कसे?
१९६२ मध्ये चीनने भारतावर हल्ला केला हाेता. तेव्हा चीनचा जीडीपी भारताहून १७ टक्के कमी हाेता. चीनने १९८० मध्ये धावायला सुरुवात केली. आर्थिक संपन्नता हेच चीनचे ध्येय राहिले. १९८० ते २००० पर्यंत भारताचे उद्दिष्ट काय हाेते? हा शाेधाचा विषय आहे. परंतु आज परिस्थिती तुमच्या समाेर आहे. आगामी १०-२०-३० वर्षांत ती आणखी बिकट हाेईल.

चीनमधील एलिट वर्ग भारताकडे आदराने पाहत नाही का?
चीन संपन्नता व शक्तीचा आदर करताे. दहाव्या शतकापर्यंत चीन भारताचा आदर करत हाेता. आता नाही. आज चीनचे सुशिक्षित लाेक भारतातील लाेकांना गरीब व कमकुवत मानतात. भारताच्या लाेकशाहीला गुंतागुंतीचे मानले जाते.

लडाखमध्ये आक्रमक, तिबेटबाबत भारताच्या दृष्टिकाेनाकडे कसे पाहता?
भारताशी थेट युद्धात विजय मिळू शकणार नाही, याची चीनला कल्पना आहे. परंतु टेक्नाॅलाॅजी वाॅरफेअरमध्ये चीन खूप पुढे निघून गेला आहे. त्याची अमेरिकेलाही चिंता वाटू लागली आहे. चीन प्रत्येक पावलाकडे दीर्घकाळाचा विचार करून बघताे. लडाखच्या माध्यमातून चीन पुढचे लक्ष्य बघू लागला आहे. लडाखमुळे भारत, अमेरिका व क्वाॅडच्या बाजूने झुकू लागला आहे. परंतु तैवान हा चीनसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी चीन युद्धही करायलाही तयार हाेईल. इच्छा असाे की नाही. परंतु भारताला तयारी ठेवावी लागेल.

अमेरिका-चीनसाेबत भारत मैत्री ठेवू शकताे?
चीनला नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताला अमेरिकेसारख्या बाह्य शक्तींची मदत घ्यावी लागेल. दाेघांनाही एकत्र आणणे साेपे नाही.परंतु चीनने अटलांटिकमध्ये हस्तक्षेप करता कामा नये.

बातम्या आणखी आहेत...