आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान बदल:भारत-पाकमध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता 30 पट जास्त, तापमानात 1 टक्का वाढ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा भारत-पाकिस्तानमध्ये मार्चपासूनच ऊन जास्त तापू लागले होते. नागरिक त्रस्त झाले. आता वर्ल्ड वेदर अट्रिब्यूशन इनिशिएटिव्हच्या अहवालातून हा हवामान बदलाचा परिणाम आहे यास पुष्टी मिळाली. दोन्ही देशांच्या सरासरी तापमानात एक टक्क्याने वाढ झाली. उष्णतेच्या लाटेचा होणाऱ्या सरासरी तापमानापेक्षा यंदा त्याची तीव्रता ३० पटीने जास्त होती, असे अहवालात म्हटले आहे. या उपक्रमातील रेड क्रॉस रेड क्रिसेंट क्लायमेट सेंटरचे सल्लागार रूप सिंह म्हणाले, हवामान बदलामुळे आगामी काही वर्षे अशा प्रकारची उष्णतेची लाट येऊ शकते. परंतु त्याचा अंदाज आताच लावता येणार नाही. कदाचित एका शतकामध्ये एकदाच अशी लाट येत असावी. कदाचित शतकात दोनवेळा किंवा दर पाच वर्षाला देखील हे घडू शकते. उष्णतेचा परिणाम गव्हावर झाल्याने भारताला निर्यात रोखावी लागली. पाकिस्तानात मॉलपासून मशिदीपर्यंत कूलिंग सेंटर उभारावे लागले.

अमेरिकेतही विक्रमी उष्णता
अमेरिकेच्या डझनावर राज्यांत उष्णतेमुळे व्यवस्थेत बदल करावा लागला. वाॅशिंग्टन ३५.५ अंश, बोस्टन ३४ अंश एवढे तापमान नागरिकांना सोसावे लागले. येथील वातावरणाच्या तुलनेत हे खूप जास्त आहे. तापमानाच्या व्यतिरिक्त उष्णतेच्या लाटेचा परिणामही अनेक ठिकाणी दिसून आला. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार संपूर्ण अमेरिकेला उष्णतेचा प्रचंड झळा सोसाव्या लागतील.

बातम्या आणखी आहेत...