आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडोनेशियातील सुंद्रा सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या एका फेरीमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीला उचलून थेट समुद्रात फेकून दिले. ही भयंकर घटना त्या फेरीवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 24 फेब्रुवारी रोजी स्थानिक पोलिसांनी जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नीच्या मागे चालताना दिसत असून तो बाकड्यांपाशी आल्यावर पत्नीला उचलून थेट जहाजाच्या बाहेर फेकून देताना दिसत आहे.
सुदैवाने ती महिला खाली पाण्यात पडण्यापासून वाचते. महिला जहाजच्या रेलिंगला धरून राहिल्यावर इतर प्रवासी तिच्या मदतीसाठी धाव घेतात. अवघ्या काही क्षणांत घडलेल्या या घटनेमुळे इतर प्रवासीही क्षणभर अवाक होतात. पण नंतर मग तिथे धाव घेऊन ते महिलेला परत डेकवर आणण्यासाठी घाई करतात.
बकाउहेनी पोर्ट पोलिस सेक्टरचे प्रमुख रिधो रफिका यांनी म्हटले आहे की, मेरक ते बकाउहेनी या शालेम पॅसेंजर फेरीवर ही घटना घडली आहे. पती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने महिलेने या घटनेची तक्रार केली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
समुद्रात असे हल्ले होण्याच्या घटना नवीन नाहीत. रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी 2018 मध्ये तीन मुलांच्या वडिलांवर आपल्या मैत्रिणीला क्रूझच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. डेव्हिड जेम्स फिश या 46 वर्षीय व्यक्तीने एका वादानंतर त्याच्या जोडीदाराला टास्मानियन समुद्रात फेकण्याचा प्रयत्न केला होता.
गतवर्षी नोव्हेंबरमध्येही मेक्सिकोच्या आखाताजवळ एका क्रूझच्या बाहेर फेकल्या गेल्यानंतर बेपत्ता झालेला प्रवासी यूएस कोस्ट गार्डला हायपोथर्मियाच्या लक्षणांसह सापडला होता. कोस्ट गार्ड्सना सापडण्यापूर्वी ही 28 वर्षीय व्यक्ती पाण्यात 15 तास तग धरून राहिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.