आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंडोनेशियात श्रीविजया एअरलाइन्सचे विमान शनिवारी बेपत्ता झाले. यामध्ये सात मुले आणि 6 क्रू मेंबर्ससह 62 लोक होते. विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. समुद्रात काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कचरा दिसला आहे. तथापि, ते हरवलेल्या विमानाचे आहे की नाही याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही.
श्रीविजया एअरच्या SJ182 क्रमांकाचे विमान बेपत्ता झाले आहे. बोइंग 737-500 क्लासच्या विमानाने जकार्ताच्या सुकर्णो-हट्टा विमानतळावरून उड्डाण घेतले होते. उड्डाणाच्या 4 मिनिटातच याचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC)सोबतचा संपर्क तुटला. त्यावेळी विमान 10 हजार फूट उंचावर होते. विमानांवर नजर ठेवणाऱ्या FlightRadar24 वेबसाइटनुसार, त्यांना विमान अचानक खाली आल्याचे संकेत मिळाले आहेत.
Sriwijaya Air flight #SJ182 lost more than 10.000 feet of altitude in less than one minute, about 4 minutes after departure from Jakarta.https://t.co/fNZqlIR2dz pic.twitter.com/MAVfbj73YN
— Flightradar24 (@flightradar24) January 9, 2021
घटनास्थळावर जहाज आणि बचाव पथक पाठवले
ज्या ठिकाणावरून विमानाचा ATC शी संपर्क तुटला तिथे समुद्र आहे, त्यामुळे शोध जहाज आणि बचाव दलाला तेथे पाठवले आहे. रिपोर्ट्स नुसार, हे विमान 26 वर्षांपेक्षा जुने असून अमेरिकेच्या काँटिनेंटल एअरलाइन्सने 1994 मध्ये खरेदी केले होते. त्यांच्याकडून श्रीविजया एअरलाइन्सने त्याला विकत घेतले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.