आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असमानता:न्यूयॉर्कमध्ये मुलांचे संगोपन महागडे, कृष्णवर्णीय कुटुंबे सोडताहेत शहर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर एकेकाळी कृष्णवर्णीयांचे आवडीचे ठिकाण होते. अॅथीनिया रॉडनी ब्रुकलिन सारख्या कृष्णवर्णीयबहुल भागात वाढली. तिने पदवीनंतर आपला व्यवसाय सुरू केला. ती एका बेडरुमच्या भाड्याच्या घरात आपल्या तीन मुलांसोबत रहायची. जास्त भाड्यामुळे मोठ्या घरात राहू शकत नव्हती. गेल्या वर्षी रॉडनीने स्नेलव्हिलेत पाच खोल्यांचे घर विकत घेतले आणि न्यूयॉर्क सोडले. ती म्हणते, न्यूयॉर्कमध्ये कुटुंबाचे संगोपन खूप कठीण आहे.

रॉडनीचा त्या कृष्णवर्णीय कुटुंबात समावेश आहे जी न्यूयॉर्कमधून पलायन करत आहेत. २०१० ते २०२० दरम्यान शहरात आशियायी आणि हिस्पेनिक लोकांची संख्या वेगाने वाढली आणि कृष्णवर्णीयांची घटली आहे. ही घट तरुण कृष्णवर्णीय व्यावसायिक, मध्यमवर्गीय कुटुुंब आणि निवृत्त झालेल्या लोकांकडून अमेरिकेच्या ईशान्य आणि मध्य पश्चिम शहरांकडून दक्षिणेकडे जाण्याचा राष्ट्रीय कलाचे चित्र दाखवते. रॉडनी सारखे कृष्णवर्णीय कुटुंबांनी शहर सोडण्याची अनेक कारणे आहेत. काही शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेने चिंतेत आहेत. काहींना नातेवाईकांजवळ जायचे आहे. काहींना शहरी आयुष्यातून सुटका हवी आहे. मात्र सर्वात मोठे कारण महागाई आहे. न्यूयॉर्कमध्ये मुलांचे संगोपन खूप महागडे आहे. पलायनामुळे कृष्णवर्णीय नेते आणि अर्थतज्ञांना काळजीत टाकले आहे. ते सांगतात, नर्सिंग सारख्या उद्योगात काम करणाऱ्यांची टंचाई होईल. नर्सिंगमध्ये खूप जास्त कृष्णवर्णीय कामगार आहेत. कृष्णवर्णीय तरुण कुटुंबांचे म्हणने आहे की, महागाई आणि घरभाडे खूप जास्त असल्याने शहरात सर्वच जण प्रभावित झाले. मात्र, घरांच्या मालकीबाबत कृष्णवर्णीय कुटुंब गोऱ्या कुटुंबांच्या खूप मागे आहेत. ताज्या आकडेवारीनुसार मध्यमवर्गीय कृष्णवर्णीय कुटुंबाचे उत्पन्न ४३ लाख रुपये आहे तर गोऱ्या कुटुंबाचे ८० लाख रुपये आहे. न्यूयाॅर्क सोडणारे बहुतांश कृष्णवर्णीय दक्षिण भागात वसले आहेत. पलायनामुळे न्यूयॉर्कमध्ये पाच वर्षात शासकीय मदतीने चालणाऱ्या शाळांमध्ये एक लाख विद्यार्थी कमी झाले. ही स्थिती बाेस्टन, शिकागोसह जिल्ह्यात आहे.

मुले आणि किशोर जास्त करताहेत पलायन
दोन दशकात न्यूयॉर्कमध्ये कृष्णवर्णीयांच्या संख्येत दोन लाख वा नऊ टक्के घट झाली आहे. आता पाचपैकी एक रहिवासी हिस्पेनिक कृष्णवर्णीय आहे, तर २००० मध्ये ते चारपैकी एक होते. सर्वाधिक कृष्णवर्णीय न्यूयॉर्क सोडत आहेत. २०१० ते २०२० दरम्यान शहरात राहणारे कृष्णवर्णीय मुले आणि किशोरांची संख्या १९ टक्क्यांपेक्षा जास्त कमी झाली आहे. कृष्णवर्णीय महिलांचा जन्मदर कमी असल्याने शाळांमध्ये कृष्णवर्णीय मुलांची संख्या घटली आहे.

बातम्या आणखी आहेत...