आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसर्गाचा गुणाकार:रशियामध्ये संसर्ग वाढला; दररोज 10 हजार रुग्ण, मॉस्कोसह 85 हॉटस्पॉट

मॉस्कोएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
छायाचित्र सेंट पीटर्सबर्गच्या एका कब्रस्तानचे आहे. येथे लोकांना येण्यास मनाई आहे. आरोग्य कर्मचारी अंत्यसंस्कार करत आहेत. - Divya Marathi
छायाचित्र सेंट पीटर्सबर्गच्या एका कब्रस्तानचे आहे. येथे लोकांना येण्यास मनाई आहे. आरोग्य कर्मचारी अंत्यसंस्कार करत आहेत.
  • जगातील इतर देशांचे हाल, कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण येताहेत

कोरोनामुळे सर्वाधिक बाधित रशिया हा जगातील दुसरा देश आहे. येथे पाच दिवसांत दररोज किमान १० हजार रुग्ण आढळून येत आहेत. रशियापेक्षा बाधितांची सर्वात जास्त संख्या अमेरिकेत आहे. रशियात आतापर्यंत १ लाख ८७ हजार ८५९ रुग्ण आढळून आले आहेत. येथे मृत्यूदर ०.९ टक्के आहे. आतापर्यंत १ हजार ७२३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झालेला रशिया जगातील पाचव्या क्रमांकाचा देश ठरला आहे. सरकारने देशात ८५ हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. त्यात मॉस्को हा मोठा हॉटस्पॉट आहे. येथे निम्मे म्हणजे ९२ हजार ६७६ रुग्ण राजधानीतील आहेत. महापौर सर्गेई सोबयानिन यांनी मॉस्कोमध्ये २.५ लाख लोकांना बाधा होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याशिवाय लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. 

सार्वजनिक ठिकाणे व वाहनांत मास्क, हातमोजे अनिवार्य करण्यात आले आहेत.अत्यंत गरजेचे काम असले तरच घराबाहेर पडण्याची सूचना करण्यात आली आहे. परंतु बाहेर जाणे आवश्यक असल्यास अशा लोकांनी सरकारी पास तयार करावे. सरकारने ११ मेपर्यंत कामकाज अवकाश जाहीर करण्यात आला आहे. वेगवेगळ्या राज्यांनी आपल्या पातळीवर लॉकडाऊन निश्चित केले आहेत. 

पुतीन यांनी केले मान्य 

रशियात आतापर्यंत ४८ लाखांवर तपासणी करण्यात आली आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पीपीई व मास्कचा तुटवडा असल्याचे मान्य केले. दोन आठवड्यांत तीन बाधित डॉक्टरांनी खिडकीतून उडी मारल्याच्या घटना घडल्या आहेत. 

चिंता : ९७ डॉक्टरांचा मृत्यू

रशियात कोरोनामुळे ९७ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. हजारो आरोग्य कर्मचारी बाधित झाले आहेत. सेंट पीटर्सबर्गच्या एका रुग्णालयात १११ आरोग्य कर्मचारी बाधित झाले आहेत. अनेक आरोग्य कर्मचारी म्हणाले, पीपीई तर दूरच, आम्हाला मास्कदेखील उपलब्ध होत नाहीत. तक्रार केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. आरोग्य कर्मचाऱ्यांवर किती दबाव आहे.

१ लाख  लोकांसाठी २७ व्हेंटिलेटर

जॉन हापऊकिन्स सेंटरच्या अहवालानुसार रशियात प्रति लाख लोकांमागे २७ व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी बहुतांश व्हेंटिलेटर मध्य तसेच जिल्हा रुग्णालयांत आहेत. त्यांची १९९० ची बनावट होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार व्हेंटिलेंटरची क्षमता नव्या व्हेंटिलेटरच्या तुलनेत कमी आहे. केवळ संख्येचा विचार केल्यास अमेरिकेत रशियाच्या तुलनेत प्रति लाख लोकसंख्येमागे केवळ १९ व्हेंटिलेटर आहेत.

बातम्या आणखी आहेत...