आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाेच्च नेते पीडित:पाकिस्तानात राष्ट्रपती, संरक्षणमंत्र्यांनाही संसर्ग; इम्रान खान पत्नीसह पाॅझिटिव्ह

इस्लामाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील सर्वाेच्च पदावरील नेत्यांना काेराेनाची बाधा झाली. राष्ट्रपती डाॅ. आरिफ अल्वी व संरक्षणमंत्री परवेझ खट्टक यांनाही संसर्ग झाला. पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या पत्नीही पाॅझिटिव्ह आल्या आहेत.

काेविडची लस घेतली हाेती. परंतु अँटिबाॅडीज दुसऱ्या डाेसनंतर तयार हाेत असल्याने बाधा झाली. सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन अल्वी यांनी केले. त्यांच्या पत्नी समिना अल्वी मात्र निगेटिव्ह आल्या आहेत. खट्टक देखील पाॅझिटिव्ह असल्याचे सिंध राज्यपाल इम्रान इस्माइल यांनी सांगितले. इम्रान खान व त्यांची पत्नी २० मार्च राेजी पाॅझिटिव्ह आल्या हाेत्या. पाकिस्तानात गेल्या चाेवीस तासांत ४ हजार ८४ नवे बाधित आढळून आले. आता देशातील बाधितांची एकूण संख्या ६६३२०० झाली आहे. मृतांचा आकडा १४ हजार ३५६ झाला.

पंजाबमध्ये गेल्या चोवीस तासांत रुग्ण संख्या प्रचंड वाढली आहे. २ हजार ८०० हून जास्त रुग्ण आढळले आहेत. आता राज्यात ११ एप्रिल पर्यंत नियम जास्त कडक करण्यात आले आहे. लोक विवाह साजरा करू शकत नाहीत. त्याशिवाय गर्दी करण्यावर बंदी आहे. तिसऱ्या लाटेमुळे रुग्णालयांत उपचारासाठी खाटा आणि इतर व्यवस्था उपलब्ध नाही. आधीच पाकिस्तानात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे जास्त समस्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...