आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Initiative For Self testing Of 30,000 Citizens From 140 Countries For Early Arrival Of Corona Vaccine

दिव्य मराठी विशेष:कोरोना लस लवकर येण्यासाठी 140 देशांतील 30 हजार नागरिकांचा स्वत:वर चाचणीसाठी पुढाकार

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • अमेरिकी एफडीएच्या मंजुरीनंतरच करता येतील अशा चाचण्या
  • वन डे सूनर संस्थेचा उपक्रम, युवा व निरोगी करू शकतात नोंदणी
Advertisement
Advertisement

कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असल्याने जगभरात लसीवर वेगाने काम सुरू आहे. या कामात मदतीसाठी अनेक जण पुढे येत आहेत. अशात अमेरिकेच्या एका संस्थेने एक अभियान सुरू केले आहे. यात लसीच्या चाचणीसाठी स्वत: कोरोनाबाधित होण्यासाठी तयार असलेल्या लोकांची यादी तयार केली जात आहे.

वन डे सूनर संस्थेच्या या अभियानात १४० देशातील ३० हजारांहून जास्त नागरिक सहभागी झाले आहेत. तसेच या लोकांची संख्या वाढत जात आहे. अहवालानुसार, शास्त्रज्ञ चाचणी दरम्यान निरोगी लोकांना लस देऊन समाजात वावरण्यासाठी सोडतात. यानंतर त्यांना संसर्ग होण्याची वाट बघितली जाते. यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातील प्रतिक्रियांची माहिती होते. या पूर्ण प्रक्रियेत बराच वेळ लागतो. यामुळे लस बाजारात येण्यासाठी विलंब होऊ शकतो. मात्र या संस्थेचा विचार शास्त्रज्ञांपेक्षा वेगळा आहे. संस्थेनुसार, संस्था ह्यूमन चॅलेंज ट्रायलवर भर देते. जे लोक चाचणीसाठी तयार आहेत त्यांना लस दिली जाते. यामुळे लसीचे परिणाम लवकर  दिसून येतात. स्वत: पुढाकार घेणाऱ्यांसाठी संस्थेने अनेट अटी ठेवल्या आहेत. यात केवळ युवक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणारे लोकच नोंदणी करू शकतात. दुसरीकडे स्वयंसेवक सांगतात, आम्ही समाजाच्या हितासाठी पुढाकार घेत आहोत. लोकांचे प्राण वाचण्यासाठी लस लवकर येणे गरजेचे आहे.

Advertisement
0