आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Initiative To Connect With Culture France Is Giving Children 26 Thousand Rupees; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:संस्कृतीशी जोडण्याचा उपक्रम - फ्रान्स मुलांना देत आहे 26 हजार रुपये; स्थानिक पुस्तके-व्हिडिओ गेम खरेदीची, कला महोत्सवांना जाण्याची अट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कल्चर पास अॅपद्वारे मोठे संगीत महोत्सव, मैफलीत प्रवेश मिळणार, दोन वर्षांत पैसे खर्च करता येणार

फ्रान्समध्ये मुलांना संस्कृतीशी जोडण्यासाठी एक आगळीवेगळी मोहीम सुरू झाली आहे. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत १८ वर्षांखालील मुलांना २६ हजार रुपये मिळतील. ही रक्कम ते २ वर्षांत खर्च करू शकतील. त्यासाठीची अट अशी की, त्यांनी पुस्तके, व्हिडिओ गेम स्थानिक स्तरावरच खरेदी करावेत. व्हिडिओ गेमची निर्मिती फ्रेंच कंपन्यांचीच असावी. त्यात हिंसाचार नसावा. या योजनेसाठी ‘कल्चर पास’ हे स्मार्टफोन अॅप लाँच केले आहे. महामारीनंतर मुलांना संस्कृतीबद्दल आस्था निर्माण व्हावी अशी मॅक्रॉन यांची इच्छा आहे.

या पासद्वारे मुले सॉलेझ म्युझियममधील लाइव्ह स्ट्रीमिंग आणि एव्हिग्नन थिएटर फेस्टिव्हल अशा फ्रान्समधील व्हीआयपी कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. त्याशिवाय प्रकल्पाशी संबंधित ८ हजार स्थानिक संस्थांकडून वस्तू-सेवा तसेच चित्रपट, संगीत मैफली, नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची तिकिटे घेऊ शकतील. प्रकल्पात सहभागी फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव नोएल कार्बिन यांनी सांगितले की, या उपक्रमाद्वारे आम्ही मुलांना जवळच्या सांकृतिक गोष्टींशी जोडण्याची संधी दिली आहे.

अॅप राष्ट्रीय स्तरावर रोल आऊट झाल्यानंतर ७३% मुलांनी नव्या सांस्कृतिक घडामोडीत रस दाखवला, तर ३२% प्रथमच म्युझियममध्ये गेले. स‌र्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ गेमपेक्षा पुस्तकांची खरेदी जास्त झाली. पॅरिस विद्यापीठात इकॉनॉमिक्स ऑफ कल्चरच्या प्राध्यापक जीन मिशेल म्हणाल्या की, मुलांना स्थानिक कला व संस्कृतीशी जोडण्याचा हा उत्तम प्रकल्प आहे.विद्यार्थिनी ज्युलिएट सेगा म्हणाली की, मी ३५०० रुपये खर्च करून पुस्तके खरेदी केली. १८ वर्षीय विद्यार्थी गॅब्रिएल टिन आणि त्याच्या मित्रांनी फ्रेंच गीतांच्या रेकॉर्डवर १७,५०० रु. खर्च केले आहेत.

सुरुवातीच्या दोन महिन्यांत ६ लाखांपेक्षा जास्त मुलांनी अॅपचा वापर केला
अॅपची लोकप्रियता एवढी आहे की, सुरुवातीच्या दोन महिन्यांतच ६.३ लाख मुलांनी ते डाऊनलोड करून वापरले आहे. पॅरिसमध्ये दोन पुस्तक दुकाने असलेल्या नाझा शिफर्ट म्हणाल्या की, कल्चर पासमुळे मला फायदा झाला आहे. आधी ई-कॉमर्सद्वारेच पुस्तके खरेदी केली जात होती. आमच्या दुकानात येऊन खरेदी करण्याची सवय नव्हती. पण सध्या बहुतांश ग्राहक मुलेच आहेत. माध्यमांच्या वृत्तांत दावा करण्यात आला आहे की, मुलांनी सर्वाधिक खर्च जपानी मंगा कॉमिक्सवर केला. पुस्तक विक्रेत्यांच्या मते, ‘मंगा’ला पहिली पसंती आहे, पण मुले दुसरे पुस्तक संस्कृतीशी संबंधितच घेतात.

बातम्या आणखी आहेत...