आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Injustice Against Indians In Singapore, 2 Lakh Jobs Lost In Corona, Policy To Stop Foreign Traders In Singapore|Marathi News

भारतीयांची संधी हिरावली:सिंगापुरात भारतीयांवर अन्याय, कोरोनात 2 लाख नोकऱ्या गेल्या, सिंगापूरमध्ये विदेशी व्यावसायिकांना रोखण्याचे धोरण

सिंगापुर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापुरात भारतीयांविरोधात रोष वाढत आहे. त्यांना वाटते की भारतीय त्यांची नोकरी हिरावत आहेत. हाच रोष दाबण्यासाठी सरकार विदेशी व्यावसायिकांचा मार्ग खडतर करत आहे. आता ईपी पास निम्न स्तरावर काम करणाऱ्या भारतीयांनाच दिला जात आहे. भारतीयांना आयटी आणि डेटा अॅना लिस्ट या क्षेत्रात संधी दिली जात आहे, जेथे त्यांना दुसरा पर्यायच मिळू शकत नाही. परंतु बँकिंग आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये संधी हिरावून घेतली जात आहे.

सिंगापूरच्या वर्कफोर्समधून भारतीय बाहेर पडत असून नवीन नियम भविष्यात त्यांच्या वाटाच बंद करत आहे. आता विदेशी व्यावसायिकांची (एम्प्लॉयमेंट पास आणि एस पास होल्डर) किमान वेतनवाढ करण्याच्या निर्णयाचा परिणाम भारतीयांवर होणार आहे. नव्या ईपी होल्डरचे किमान वेतन ३.४३ लाख ते ३.८१ लाख रु. (४५०० डॉलर ते ५००० डॉलर) आणि एस पास होल्डरचे १.९० लाख तेे २.२८ लाख रु. (२५०० ते ३००० डॉलर) करण्यात आले. जुन्या ईपी अर्जदारांसाठी निर्धारित वेतन, जे वय आणि अनुभवासोबत वाढते, तेही वाढवले जाईल. हे बदल पुढील वर्षी सप्टेंबरपासून अमलात येतील. याशिवाय पुढील वर्षी आणि सप्टेंबर २०२५ मध्ये किमान वेतन वाढले जाईल. यामागील उद्देश असा की कंपन्यांनी रोजगारात स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे. सरकार सातत्याने विदेशी व्यावसायिकांसाठी मार्ग बंद करत आहे.

यामुळे कोरोना काळात सुमारे ३.५ लाख विदेशी व्यावसायिकांना सिंगापूर सोडावे लागले. यात २ लाख भारतीय आहेत. सिंगापूरच्या वर्कफोर्समध्ये ४०% विदेशी आहेत. यात दोन तृतीयांश चीन, भारत, जपान, मलेशिया, फिलिपाइन्समधील आहेत. या पलायनाचा परिणाम येथील व्यवसायावरही होत आहे. बहुतांश प्रतिष्ठांनांना वाटते की त्यांना महामारीत झालेल्या नुकसानीतून बाहेर पडणे कठीण होईल. एका हॉटेल साखळीचे मालक चेडरिक म्हणाले की, ‘फूड अँड बेव्हरेज आणि सेवा क्षेत्रातील गरजांसाठी स्थानिक लोक उपयुक्त नाहीत. आम्ही त्यांना काम देतो, पण ते लवकर सोडून जातात. बाहेरून येणारे सावध असतात. त्यांच्या पैसे कमावण्याची भूक असते. परंतु आमच्याकडे पर्याय नाही. सिंगापूर फर्निचर उद्योग परिषदेचे अध्यक्ष फुआ बून म्हणाले, ‘या निर्णयाचा परिणाम व्यावसायिक खर्चावर पडेल. साधारणपणे कंपन्या विदेशी टॅलेंटद्वारे कौशल्याची उणीव भरून काढतात. अशावेळी नवे नियम अडचणी वाढवतील. कारण ईपी, एस पास परमिटची मंजुरी प्रकिया सोपी राहिलेली नाही. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मनुष्यबळाचा तुटवडा, अधिक खर्चासह अनेक आव्हानांशी झुंजत आहे. सिंगापूर बिझनेस फेडरेशनचे सीईओ लॅम यी यंग म्हणाले की, शेवटी सिंगापूरकडे विदेशी कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. या कलाबाबत अर्थतज्ज्ञ प्रा. एन.जी. यू कवांग म्हणाले की, आता सिंगापूरचा जीडीपी ५% वाढला आहे. विदेशी व्यावसायिकांच्या अभावामुळे विकास दर निम्मेच राहू शकतो. यामुळे बेरोजगारी वाढण्याचा धोका आहे.

बातम्या आणखी आहेत...