आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरी कसाेटी घाेषित:कमिन्सकडून डाव घाेषित; ख्वाजाचे द्विशतक हुकले

सिडनीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार पॅट कमिन्सने यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा शनिवारी दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या कसाेटीचा पहिला डाव घाेषित केला. यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४ बाद ४७५ धावा काढल्या. यादरम्यान डाव घाेषित झाल्याने उस्मान ख्वाजाचे (१९५) द्विशतक हुकले. शुक्रवारी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ हाेऊ शकला नाही. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाची निराशाजनक सुरुवात झाली.

संघाने ६ गड्यांच्या माेबदल्यात पहिल्या डावात दिवसअखेर १४९ धावा काढल्या आहेत. ३२६ धावांनी पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे मार्काे जानसेन (१०) आणि सायमन हार्मर (६) मैदानावर कायम आहेत. घरच्या मैदानावर कर्णधार कमिन्सने ३ आणि वेगवान गाेलंदाज हेझलवूडने २ बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...