आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेने भारतासाेबत सेमीकंडक्टर आणि एआय उपकरणासाठी करार केला आहे. दाेन्ही देश मिळून चीनच्या अॅडव्हान्स्ड इमेजिंग टेक्नाॅलाॅजीला मात देण्याची तयारी करत आहेत. यासाठी भारत आणि अमेरिकेने क्रिटिकल अँड इमेजिंग टेक्नाॅलाॅजीसाठी(आयसीईटी) पुढाकार घेतला आहे. यात दोन्ही देशांत सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे आदान-प्रदान होऊ शकेल. करारावर अमेरिकी दौऱ्यावर गेलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी झाली. करार जाणून घेऊ...
{नवोन्मेष पूल काय करेल?
आयसीईटीअंतर्गत भारत आणि अमेरिका ६ बिंदूंवर काम करणार आहेत. त्याचा लाभ संपूर्ण जगाला मिळेल. याचा उद्देश औद्योगिक सहकार्य कृती आराखडा विकसित करणे, जेट इंजिन, दारू-गोळ्याशी संबंधित तंत्रज्ञान आणि अन्य प्रणालींशी संबंधित प्रकल्पांवर संशोधन करणे आहे. म्हणजे, हा नवोन्मेष पूल असून तो अमेरिका आणि भारतीय संरक्षण स्टार्टअप्सना जोडेल.
{दाेन्ही देश काेणत्या आव्हानांचा सामना करतीलॽ
चीनला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेने भारतासाेबत आघाडी केली आहे. यासाठी भारतीय उपखंडात वेस्टर्न मोबाइल फोन नेटवर्क स्थापन करू इच्छित होता. यामुळे चीनच्या हुवावे तंत्रज्ञानावर मात दिली जाऊ शकेल. भारताच्या मोबाइल दूरसंचार क्षेत्रात चीनच्या हुवावे तंत्रज्ञाचाही मोठा वाटा आहे. याच्या माध्यमातून अमेरिका आपल्याकडे भारतातून मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर चिप तज्ज्ञ येण्याची आशा बाळगून आहे. यानंतर दोन्ही देशांना आधुनिक लष्करी शस्त्र निर्मितीसाठी फायदा होईल. भारत दीर्घकाळापासूनचे अवलंबित्व कमी करू इच्छित असल्याने पुढे सरसावत आहे.
{दोन्ही देश आणखी काय करणार?
हा करार यासाठीही महत्त्वाचा आहे, कारण चीन सतत दुर्मिळ खनिजांचा शोध घेत आहे. अशात भारत आणि अमेरिका मिळून आता या दिशेने पुढे जातील. आयसीईटीची पुढील बैठक वर्षअखेरीस दिल्लीत होईल.
{नव्या कराराची सुरुवात कधी होईल?
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांनी मे २०२२ मध्ये कराराची मुहूर्तमेढ रोवली. दोन्ही देशांच्या सरकारांनी व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांमधील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढवण्यास व विस्तारीत करण्यासाठी आयसीआयटीत अमेरिका-भारत पुढाकाराची घोषणा केली होती. ही भागीदारी चीनसारख्या संशयित देशांचे कट निष्फळ करण्याचे काम करेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.