आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Innovation Of Students From All Over The World : Turning Off The Internet Will Keep The Head Off; Ear Rings Without Blood Samples Will Tell The Sugar Level

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगभरातील विद्यार्थ्यांचा नवोन्मेष:डोके ठेवताच तक्क्या करेल इंटरनेट बंद; ब्लड सॅम्पलविना कानातले रिंग सांगतील शुगर लेव्हल

दुबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यार्थ्यांनी तयार केले स्मार्ट डिव्हाइस, आता व्यावसायिक उत्पादनासाठी प्रयत्न

द. कोरियातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उशीवर डोके टेकताच सेन्सर वायफाय राऊटरला सिग्नल पाठवतील व इंटरनेट मोबाइलपर्यंत येऊ देणार नाहीत. यामुळे तुम्ही सुखाने झोपू शकता. असे १६६० नावीन्यपूर्ण उपक्रम दुबईत झालेल्या सहाव्या ग्लोबल ग्रँड शोमध्ये दिसून आले. सामाजिक व पर्यावरणीय मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी होतो. या वेळी तो व्हर्च्युअल झाला. ६० देशांतील २७० विद्यापीठांचे नवोन्मेष निवडण्यात आले.

खोलीचा पडदा तापमान २५ अंशावर जाऊ देणार नाही, घराचे दार थोपवेल पुराचे पाणी

> इंग्लंडच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले इअररिंग्ज रेडिओ तरंगांनी रक्ताच्या नमुन्याशिवाय साखरेची पातळी सांगतात.

> स्वित्झर्लंडच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोर्टेबल इन्क्युबेटर विजेशिवायही काम करते जे शिशूला हायपोथर्मियापासून वाचवते. दुर्गम भागासाठी ते उपयुक्त आहे.

> बर्लिनच्या विद्यार्थ्यांनी तापमान नियंत्रणात ठेवणारे पडदे केले आहेत. २५ अंशाच्या वर तापमान गेल्यास पडदे उष्णता शोषून घेतील. तापमान कमी होताच ते उष्मामुक्त करतील.

> मेक्सिकाेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला दरवाजा पूरग्रस्त भागात पुराचे पाणी घरात घुसू देणार नाही. तो ताड, केळीची पाने, लाकूड आणि उसापासून तयार केला आहे.

> लंडनच्या विद्यार्थ्यांनी परिधान करता येईल असे उपकरण तयार केले असून ते सांध्यांचे रक्षण करेल.

> ऑस्ट्रेलियाच्या विद्यार्थ्यांनी किमोथेरपी उपचारांत क्लिनिकल आवाजाला प्रकाशात बदलणारे उपकरण तयार केले असून यामुळे डॉक्टरांना थेरपीच्या विविध टप्प्यांची माहिती मिळेल.

> आयर्लंडच्या विद्यार्थ्यांनी वयस्क लोकांसाठी तोल सांभाळणारा एअरबॅग बेल्ट तयार केला आहे.

> युगांडामध्ये दूरवर शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी प्लास्टिक बाटल्या रिसायकल करून कमी किमतीचे बूट तयार कले आहेत.

> दुबईच्या एका संस्थेने खजुराच्या बियांपासून बायोडिग्रेडेबल फूड कंटेनर तयार केले आहे.

संकेतांचे होईल आवाजात परिवर्तन :

इटलीच्या विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेला आवाजात परिवर्तित करणारे आगळेवेगळे उपकरण तयार केले आहे. हे उपकरण मूकबधिर लोकांना उपयोगी ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...