आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इनोव्हेशन इंडेक्स 2021:द. कोरिया जर्मनीला पिछाडीवर टाकून पहिल्या क्रमांकावर; अमेरिका टॉप-10 मधून बाहेर

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2016 नंतर भारताच्या क्रमवारीत पहिल्यांदाच वाढ

जगभरात नव्या शोधाच्या क्षेत्रात दक्षिण कोरिया यंदा अग्रस्थानी आहे. अमेरिका आघाडीच्या १० देशांच्या यादीतून बाहेर आहे. ब्लूमबर्गने आपला इंडेक्स २०२१ जाहीर केला आहे. यादीत भारताचा क्रमांक ५० वा आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताने चार अंकांनी प्रगती केली आहे. गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या जर्मनीला कोरियाने मागे टाकले. जर्मनीचा क्रमांक आता चौथा आहे. नऊ वर्षांपासून ही क्रमवारी जाहीर केली जाते. त्यात ७ वेळा आशियाई देशांनी आघाडी घेतली आहे. यात क्रमाक्रमाने वर येत सिंगापूर व स्वित्झर्लंड क्रमश: दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. ब्लूमबर्ग इंडेक्स दहाहून जास्त मापदंडांचे विश्लेषण करते. त्यात संशोधन, विकासावरील खर्च, उत्पादनातील क्षमता, हायटेक पब्लिक कंपन्यांना प्रोत्साहन देणे व इतर निकषांवर ही क्रमवारी दिली जाते. ब्लूमबर्गचा बहुतांश डेटा कोरोना महामारीच्या आधी जाहीर झाला होता. कोरिया, जर्मनी व इस्रायलसारख्या देशांनी महामारीचा मुकाबला करताना चांगली कामगिरी केली.

टॉप-१० देशांत ७ युरोपचे
- जर्मनी चौथ्या क्रमांकावर, गेल्या वर्षी पहिल्या स्थानी.

चीनची घसरण, १६ व्या क्रमांकावर. व्यापारी युद्धात अडकल्याने घसरण झाली.
- २०१६ नंतर पहिल्यांदा भारताची क्रमवारीत झेप.

२०० पैकी जास्तीत जास्त देशांच्या अर्थव्यवस्थेची माहिती गोळा केली जाते.
- यादीत आघाडीच्या ६० देशांची यादी जाहीर झाली आहे.

भारत
इनोव्हेशनसाठी नवीन कल्पना, नवे उत्पादन व नव्या सेवांच्या मापदंडावर निवड होते. परंतु या गोष्टींचा विस्तार व त्यांची स्वीकारार्हता यावरच यश अवलंबून असते. - कॅथरिन मान, ग्लोबल चीफ इकोनॉमिस्ट, सिटी ग्रुप