आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फिलिपाइन्स:दिवंगत मुलाकडून प्रेरणा घेत दांपत्याचापुढाकार, काेराेनामुळे बेराेजगारांना माेफत सायकल भेट

मनिला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनिलात वन बाइक अॅट ए टाइम उपक्रमामुळे आतापर्यंत 50 जणांना मिळाली मदत

काेराेना व लाॅकडाऊनमुळे फिलिपाइन्सलाही फटका बसला असून हजाराे बेराेजगार झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राेनाल्डाे राेजेरियाे. राेनाल्डाे स्थानिक फूड चेनमध्ये नाेकरीला हाेते. दाेन महिन्याचे बाळ व पत्नीची देखभाल करण्यासाठी त्याने भाड्याने सायकल घेऊन राइस केक विक्री करण्याचे काम सुरू केले. मात्र कमाईतील बराचसा भाग सायकलचे भाडे व त्याच्या दुरुस्तीवर खर्च हाेत असे. परंतु एके दिवशी त्यांना करेज टू बी काइंड फाउंडेशनकडून एक नवी सायकल भेट मिळाली. या फाउंडेशनने बाइक अॅट अ टाइम अंतर्गत आतापर्यंत राेनाल्डाेसारख्या ५० हून जास्त गरजवंतांची मदत केली आहे. हा उपक्रम ग्लँडा व जाॅर्ज कॅनलस या दांपत्याने प्रत्यक्षात आणला आहे.

या दांपत्याच्या १७ वर्षीय मुलगा बेंजामिनचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला हाेता. त्याने सायकल चालवणाऱ्यांची मदत केली हाेती. हीच या उपक्रमामागील या दांपत्याची प्रेरणा ठरली. या प्रेरणेतून दांपत्याने फाउंडेशनच्या माध्यमातून सायकल दान करण्याचे कार्य सुरू केले. त्यासाठी एखाद्या परिचिताने नामनिर्देशन करणे गरजेचे आहे. त्यामुळे नेमक्या गरजवंतापर्यंत मदत पाेहाेचेल, असा त्यांचा उद्देश आहे. लाॅकडाऊनच्या काळात नाेकरी गमावणारे, फूड व पार्सल डिलिव्हरी कामाशी संबंधित लाेकांना या कार्यात प्राधान्य देण्यात आले. कारण या लाेकांना ऊन, पाऊस-थंडी, अशा प्रत्येक ऋतूमध्ये त्रास सहन करावा लागताे. या मदतीच्या उपक्रमाचे काैतुक हाेणे स्वाभाविकच. परंतु नामांकन बंद झाल्यानंतरही नाेंदणीसाठी रांग लागली आहे. े गरजूंना ही मदत मोलाची ठरली आहे.