आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशिंग्टन:इन्स्टाग्राम ठरते आहे मुलींमध्ये संकोच, तणाव वाढवणारे साधन, वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकच्या अंतर्गत अहवालाआधारे केला पर्दाफाश

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म “इन्स्टाग्राम’ मुलींमध्ये संकोच आणि तणाव वाढवणारे एक साधन ठरत आहे. या प्लॅटफॉर्मची मालकी असलेली कंपनी फेसबुकलाही याबाबत सर्व माहिती आहे. परंतु, फेसबुकने याबाबतच्या अंतर्गत अहवालांकडे केवळ दुर्लक्ष केले असे नाही, तर हे अहवाल दाबून टाकण्याचा प्रयत्न केला.

फेसबुकच्या याच अंतर्गत अहवालाच्या आधारे अमेरिकी वृत्तपत्र “वॉल स्ट्रीट जर्नल’ने हा पर्दाफाश केला आहे. या वृत्तमालिकेत नमूद करण्यात आले आहे की, फेसबुक आपल्याच नियम व निकषांचे उल्लंघन करत आहे. या अहवालात फेसबुकच्या माजी कर्मचाऱ्यांची वक्तव्ये नोंद आहेत. त्यांनी हे इन्स्टाग्राम व्यासपीठ नि:पक्ष नसल्याचे म्हटले आहे. अहवालात म्हटले आहे की, मुलींच्या स्वत:च्या शरीराबद्दलचे विचार आपण एवढ्या वाईट स्तरावर नेले आहेत की यामुळे मुलींमध्ये संकोच आणि तणाव वाढत चालला आहे. याला सर्वस्वी इन्स्टाग्रामच जबाबदार आहे. दरम्यान, याबाबत फेसबुकच्या वतीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. विचार मांडण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या सोशल मीडियातील माध्यमांबद्दल वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या बातम्यांमुळे खळबळ उडाली आहे.

झुकेरबर्ग फेसबुक नि:पक्ष असल्याचे सांगतात, पण तेही खोटेच
या वृत्तपत्रानुसार, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आपली व्यासपीठे नि:पक्ष असल्याचे सांगतात. परंतु, हे अगदी असत्य आहे. २०१९ च्याच आणखी एका अंतर्गत अहवालानुसार, कंपनीने व्हाइटलिस्टिंग पॉलिसी तयार केली आहे. यानुसार, काही विशिष्ट गट, संघटना, व्यक्तींना विश्वासपात्र मानले जाते. यात बहुतांश बडे नेते, सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित लोक असतात. त्यांना नियम मोडण्याची अगदी सूट असते.

हे प्रसिद्ध व्यासपीठ ना नि:पक्ष, ना पारदर्शक : माजी कर्मचाऱ्यांचेच मत
वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, फेसबुकला आपल्या विविध व्यासपीठांवर सुरू असलेल्या बनावट, खोट्या बातम्यांची किंवा विशेष माहितीची संपूर्ण जाणीव असते. त्याचा समाजावर किती परिणाम होईल याचीही जाणीव असते. परंतु, कंपनी याबाबत अमेरिकी अध्यक्षांच्या कार्यालयालाही (व्हाइट हाऊस) माहिती देत नाही. उदाहरणार्थ - २०१८ मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने एक बातमी दिली होती. त्यानुसार, फेसबुकच्या सुरक्षाविषयक पथकाला २०१६ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ रशियाच्या वतीने सोशल मीडिया, आदींच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपाची माहिती मिळाली होती. मात्र, सीईओ शेरिल सँडबर्ग आणि जागतिक सार्वजनिक धोरणविषयक विभागाचे उपाध्यक्ष जोएल कपलॅन यांनी ही माहिती दाबून टाकली.

बातम्या आणखी आहेत...