आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Intensive People Flee Bamiyan In Fear Of Taliban, Young Women Fill Cave Schools To Educate Children | Marathi News

धाडस:तालिबानच्या भीतीत बामियानमधून पळाले सधन लोक, मुलांना शिकवण्यासाठी गुहेत शाळा भरवतेय तरुणी

बामियान6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांना शिकवण्याची आवड 10 वर्षांपासून, तालिबान शोधू शकले नाही

अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करून तालिबानला सहा महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. यादरम्यान अनेक लोक शहर आणि देश सोडून पळाले होते. बौद्धांचा गड मानले जाणारे प्राचीन बामियान शहरातही असेच झाले. तेथील जवळपास सर्व सधन लाेक बामियान सोडून गेले. यादरम्यान एक पदवीधर युवती फिस्ताने धाडस दाखवले. तिने गरीब मुलांना शिकवणे सुरू राहावे यासाठी आपली शाळा बंद केली नाही. तालिबान्यांच्या तावडीत न येऊ नये यासाठी डोंगरातील गुहेत आपली शाळा चालवत आहे. तेथे ती मुलांना अनेक तास शिकवत आहे. तिने स्थानिक डारी भाषेसोबत इंग्रजीही शिकवली. कुराणच्या आयातीही शिकवल्या.

ही शाळा चालवण्यासाठी तिने लोकांच्या घरांत काम केले आणि स्थानिक बााजारातून सामानही विकले. फिस्ताने एका वृत्तपत्राला सांगितले की, ती शाळा चालवतेय त्याला १० वर्षे झाली आहेत. ती जेव्हा १२ वर्षांची होती तेव्हा ही शाळा उघडली होती. या शाळेत आसपासच्या जवळपास ५० कुटुंबातील ४ ते १७ वर्षांपर्यंतची मुले येतात. गेल्या ऑगस्टमध्ये तालिबानने नव्याने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर ती घाबरली होती. दुसऱ्या गावातून शिकायला आलेल्या मुलीच्या आईने सांगितले की, तालिबानच्या भीतीमुळे गाव सोडून गेलो. आता परतलो आहोत तर मुलांना शिकवण्यासाठी पैसे नाहीत. या शाळेमुळे आता आधार मिळाला आहे.

गावापर्यंत ३ वेळा तालिबान आले, शोधू शकले नाहीत
फिस्ता म्हणाली, ‘माझ्या मित्रांनी सल्ला दिला होता की, भिंतीवर चिकटवलेले पोस्टर्स हटवावेत. कारण मी मुलींना शिकवत होते. यानंतर मी ते काढून नदीत फेकून दिले. तालिबान गावापर्यंत तीन वेळा आले होते. मात्र, ते गुहेतील माझी शाळा शोधू शकले नाहीत. बामियानमध्ये फिस्ता स्वखर्चाने शाळा चालवणारी एकमेव आहे.

बातम्या आणखी आहेत...