आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनलॉकच्या दिशेने जगाची वाटचाल:35 देशांत आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ण सुरू; 72 देशांत मर्यादित, 96 देशांत बंदीच

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वाधिक कोरोनाबाधित जर्मनी-फ्रान्समध्ये तर शाळाही झाल्या सुरू, असे जगात एकूण १० देश

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मार्चमध्ये जवळपास सर्वच देशांत लॉकडाऊन जाहीर झाले होते. यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली. आता हळूहळू अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली आहेत. भारत सरकारनेही अमेरिका आणि फ्रान्ससाठी विशेष सेवा सुरू करण्याची घोषणा केली. १७ ते ३१ जुलैपर्यंत अमेरिका आणि १८ जुलै ते १ ऑगस्टपर्यंत फ्रान्सच्या ठरावीक शहरांसाठी विमाने रवाना होतील.

३५ देशांनी नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली आहेत. यात इंग्लंड, आयर्लंड, मेक्सिको, अफगाणिस्तान, युक्रेनचा समावेश. या देशांत प्रवाशांसाठी वेगवेगळे नियम व प्रोटोकॉल निश्चित केले आहेत.

या देशांनी मर्यादित उड्डाणे सुरू केली : 

चीन, अमेरिका, रशिया, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, इराण, फ्रान्स, न्यूझीलंड, जपान, द. कोरियासह ७२ देशांनी मर्यादित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली आहेत. मात्र, या देशांत अधिक संसर्ग असलेल्या मोजक्या देशांतून येण्यास अजून बंदी आहे.

> अमेरिकेत ब्राझील, चीन, इराण, शेंगेन क्षेत्र, आयर्लंड किंवा ब्रिटनचा दौरा करणाऱ्या नागरिकांना येण्यास बंदी आहे. उर्वरित देशांतून लोक अमेरिकेत जाऊ शकतील.

> चीनमध्ये हाँगकाँग, मकाऊ, तैवानमधूनच लोक येऊ शकतात.

> इटलीमध्ये युराेपियन युनियन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, द. कोरियासह कोरोना ‘पीक’वर असलेल्या देशांतून येता येईल.

> न्यूझीलंडने आतापर्यंत सामोन किंवा टोंगनमध्ये राहणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांनाच येण्याची परवानगी दिली आहे.

> युक्रेनला जाणाऱ्यांकडे कोरोनावर उपचारांचा खर्च कव्हर असलेला वैद्यकीय विमा असणे बंधनकारक आहे.

> तुर्कीला उतरणाऱ्यांची पीसीआर चाचणी केली जाते.

> इजिप्तमध्ये १४ दिवस आयसोलेशनची अट आहे.

> मेक्सिकोत प्रवाशांचे स्कॅन केले जाते. कोरोना लक्षणे आढळली तर या प्रवाशांना क्वॉरंटाइन केले जाते.

जर्मनी : दोन महिने सर्वाधिक बाधित देशांत समाविष्ट होता. येथे २ लाख कोरोना रुग्ण.

2 फ्रान्स : सर्वाधिक संसर्ग असलेल्या १० देशांत होता. मात्र, आता “पीक’ आले आहे.

3 स्वीडन : हा एकमेव देश... जेथे कधीच लॉकडाऊन नव्हते. ७६ हजार रुग्ण.

4 डेन्मार्क : प्रारंभीच संसर्ग रोखण्यात चांगले यश. १३ हजारांवर रुग्ण वाढले नाहीत.

5 तैवान : चीनमध्ये कोरोनाची साथ येताच सीमा सील केल्या. ४५२ पैकी ५ रुग्ण सक्रिय.

6 नॉर्वे : रुग्णांची संख्या ९ हजारांवरच रोखली. आता केवळ ६२३ सक्रिय रुग्ण.

7 न्यूझीलंड : १५४८ रुग्णांचा हा देश दीड महिन्यापूर्वीच कोरोनामुक्त घोषित होता.

8 आइसलँड : फक्त १२ सक्रिय रुग्ण. नवे रुग्ण दाखल होणे जवळपास बंद झाले.

9 द. कोरिया : दर १० लाख लोकांत २८ हजार चाचण्या. रुग्ण १३,७०० वरच थांबले.

10 व्हिएतनाम : चीनचा शेजारी देश असूनही रुग्ण ३८१ च्या वर वाढू दिले नाहीत.

या देशांत अजूनही संपूर्ण बंदी

ब्राझील, कॅनडा, सौदी अरब, द. आफ्रिका, इंडोनेशियासह ९६ देशांत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. यातील १७ देशांत उड्डाणे सुरू होतील अशी आशा व्यक्त होत आहे.