आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • International Yog Day Updates: The President Of The Global Yoga Alliance Dr Gopal Interview; News And Live Updates

जागतिक योग दिवस:2009 च्या रोम चर्चासत्रात पोर्तुगालच्या योगाचार्यांनी पहिल्यांदा ठेवला 21 जूनच्या जागतिक योग दिनाचा प्रस्ताव

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जागतिक योग दिनाची प्रक्रिया सुरू करणारे ग्लोबल योग अलायन्सचे अध्यक्ष डॉ. गोपाल

वर्ष २००९ मध्ये इटलीचे योगगुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांनी रोममध्ये योगगुरूंचे एक चर्चासत्र अायोजित केले. यात भारतासह १२ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले. भारतीय योग परिसंघाच्या प्रतिनिधींचा मी अध्यक्ष होतो. अध्यक्षस्थानी जगद्गुरू शंकराचार्य प्रयाग पीठ स्वामी ओंकारानंद होते. पोर्तुगालचे योगगुरू अमृत सूर्यानंद यांनी प्रस्ताव ठेवला की, संयुक्त राष्ट्राशी चर्चा करून २१ जूनला योग दिवस साजरा केला जावा. सर्वांचा प्रश्न होता की २१ जूनच का? सूर्यानंद यांनी सांगितले की, यूएनच्या कॅलेंडरमध्ये २१ जून रिक्त आहे.

कॅलेंडरमध्ये स्थान नसल्यास दिवस ठरवण्याचा फायदा नाही. या तारखेला सर्वात मोठा दिवस असतो. योगाचा हेतूच व्यक्तीचे आयुष्य वाढवणे आहे. सर्वसंमतीने प्रस्ताव स्वीकारला गेला व ग्लोबल अलायन्स नावाने संघटना झाली. मला अध्यक्ष करण्यात आले. १२ देशांनी २००९ मध्येच २१ जूनला प्रतीकात्मक योग दिवस साजरा केला. २०१२च्या चर्चासत्रात स्वामी अवधेशानंद, परमात्मानंद, डॉ. नागेंद्रसारखे विद्वान सहभागी झाले. श्री श्री रविशंकर व बाबा रामदेवही सहभागी झाले. लक्षात आले की, राजकीय सहकार्याशिवाय संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर मुद्दा उपस्थित करणे अवघड आहे.

तत्कालीन सरकारसमोर प्रस्ताव ठेवला, मात्र सरकार उदासीन दिसले. २०१३ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटलो. त्या वेळी त्यांचे नाव राष्ट्रीय पातळीवर पुढे येत होते. भेटीदरम्यान त्यांनी आश्वासन दिले की, जर लोकांनी त्यांच्या पक्षाला संधी दिली तर या प्रस्तावावर नक्कीच विचार करू. आनंदाची बाब म्हणजे मोदी पंतप्रधान होताच यूएनमध्ये प्रस्ताव मांडला व ४ महिन्यांतच मंजुरी मिळवली. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होऊ लागला. २६ जानेवारी २०१५ रोजी भारत सरकारने सद्गुरू अमृत सूर्यानंद यांना पद्मश्रीने सन्मानित केले. हा सन्मान मिळवणारे ते पहिले पोर्तुगीज नागरिक आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदतीशिवाय पूर्ण झाला नसता संकल्प
सर्वांना माहीत आहे की, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रात जागतिक योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तुम्हाला माहिती आहे का २१ जूनला जागतिक योग दिनाचा विचार पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पातळीवर केव्हा झाला होता? नरेंद्र मोदींपर्यंत ही गोष्ट कशी पोहोचली? या प्रक्रियेशी जवळचा संबंध असलेले ग्लोबल योग अलायन्सचे अध्यक्ष डॉ. गोपाल सांगताहेत भारतीय संस्कृतीच्या आंतरराष्ट्रीय ओळखीची पूर्ण कहाणी...

डॉ. गोपाल भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयात अधिकारी होते. एनएसएसच्या सल्लागार पदावरून निवृत्त झाले. हा वृत्तांत ‘दैनिक भास्कर’चे रितेश शुक्ला यांच्यासोबतच्या चर्चेवर आधारित आहे.

बातम्या आणखी आहेत...