आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपच्या 9 देशांच्या युवांवर केले सर्वेक्षण:इंटरनेटवर गुन्हेगारी, आक्षेपार्ह वर्तन युवांसाठी सामान्य; चाैघांपैकी एकाने केली ट्रोलिंग

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युरोपमध्ये तरुणाईकडून इंटरनेटवर आक्षेपार्ह आणि गुन्हेगारीचे वर्तन सामान्य मानण्याचा धोका घोंगावत आहे. युरोपीय संघटनेने दिलेल्या निधीच्या एका संशोधनात स्पष्ट झाले की, १६ ते १९ वर्षांच्या ४ लोकांपैकी एकाने कुणाला ना कुणाला ट्रोल केले आहे. यासोबत ३ पैकी १ डिजिटल पायरसीचा भाग राहिले.

संशोधनात दिसले की, ब्रिटनसह युरोपच्या ९ देशांच्या १६ ते १९ वर्षांच्या युवांमध्ये अशा पद्धतीची गुन्हेगारी आणि जोखमीची वागणूक वाढली आहे. हे सर्वेक्षण ८ हजार युवांवर केले होते. यात समोर आले की, ८ पैकी एकाने ऑनलाइन कोणाला ना कोणाल छळले आहे. १० पैकी एक हेट स्पीच किंवा हॅकिंगचा हिस्सा राहिले आणि ५ पैकी एक सेक्सटिंगमध्ये अडकले होते. यात हेही दिसले की, १० पैकी ४ युवांनी इंटरनेटचा वापर पोर्न पाहण्यासाठी केला आहे. संशोधनाचे लेखक सहलेखक प्रा. ज्युलिया डेव्हिडसन म्हणाले, युरोपमध्ये अनेक युवा सायबर गुन्ह्यात अडकले आहेत. ऑनलाइन कमी पातळीचे गुन्हे व इंटरनेटवर आक्षेपार्ह वर्तन सामान्य झाले आहेत

६५ टक्के महिलाही सायबर गुन्ह्याच्या जाळ्यात डेव्हिडसन म्हणाले, ७५% पुरुषांनी मान्य केले की, त्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा सायबर गुन्हा घडवला. ६५% महिला सायबर क्राइममध्ये गुंतल्या आहेत. ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनी, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि रोमानियातील युवांवर सर्वेक्षण करण्यात आले. पाहणीतील निम्मे युवा गुन्हेगारी कारवायांत गुंतले होते.

बातम्या आणखी आहेत...