आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Internet Use In The Corona Period Reduces Depression In The Elderly, And Also Improves Quality Of Life; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​कोरोना काळात इंटरनेटच्या वापराने वृद्धांमध्ये नैराश्य कमी, जीवनाच्या गुणवत्तेतही सुधारणा

लंडन12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनच्या सरे विद्यापीठाने लॉकडाऊनदरम्यान संशोधन

इंटरनेट केवळ तरुणांसाठीच नव्हे, तर वृद्धांसाठी देखील फायद्याचे आहे. त्याच्या वापरातून या वयाेगटातील नैराश्य कमी हाेऊ शकते. त्यांच्या जीवनमानाची गुणवत्ता सुधारू शकते, अशी माहिती ब्रिटनच्या सरे विद्यापीठाच्या संशाेधनातून समाेर आली आहे. विद्यापीठाच्या न्यूराेसायन्स विभागाने गेल्या वर्षी लाॅकडाऊनदरम्यान ३ हजार ४९१ लाेकांची पाहणी केली. ५५ ते ७५ या वयाेगटातील लाेकांचा त्यात समावेश करण्यात आला हाेता. लाॅकडाऊनच्या काळात नातेवाइकांशी संवाद साधण्यासाठी इंटरनेटचा वापर करणाऱ्या वृद्धांना नैराश्य मुळीच जाणवले नाही ही बाब या पाहणीतून दिसून आली.

किंबहुना त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारली. त्यावरून इंटरनेट वृद्धांना एकटेपणाच्या दबावाला काही प्रमाणात नक्कीच कमी करण्यासाठी उपयाेगी ठरू शकते. त्याशिवाय या वयाेगटातील लाेक काेणकाेणते विषय इंटरनेटवर किती वेळ पाहतात हेदेखील समजू शकले. ब्रिटनच्या सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार देशात १६ ते ४४ वर्षीय हा इंटरनेटचा ९९ टक्के वापर करताे. ७५ वर्षांहून जास्त वयाचे ५४ टक्के लाेक नियमितपणे इंटरनेटचा वापर करतात. परंतु वृद्धांच्या संख्येत सातत्याने वाढ हाेत चाललीये. २०१३ मध्ये ७५ वर्षांहून अधिक वयाचे देशात २९ टक्के इंटरनेट युजर हाेते. २०२० पर्यंत ते वाढून ५४ टक्के झाले. म्हणजेच दुप्पट वाढ झाली.

आराेग्याची माहिती घेणारे नैराश्याच्या गर्तेत
आराेग्याशी संबंधित माहिती इंटरनेटवर शाेधणारे बहुतांश लाेक नैराश्याच्या गर्तेत सापडल्याचे आढळून आले. मात्र तेव्हा काेराेना महामारीचा जाेर सुरू हाेता असे संशाेधकांचे म्हणणे आहे. तेव्हा समाजात आराेग्याबाबतची चिंता सर्वांनाच सतावत हाेती. सरे विद्यापीठात डाॅ. सायमन इव्हांस यांच्या म्हणण्यानुसार भविष्यात लाॅकडाऊनसारखी स्थिती आल्यास वृद्धांना एकटेपणाशी लढताना इंटरनेटची मदत हाेऊ शकते, असे संशाेधकांना वाटते.

बातम्या आणखी आहेत...