आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नीरव मोदीच्या अडचणीत वाढ:पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरवची पत्नी, भाऊ आणि बहिणीविरोधात इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटिस

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13,700 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव लंडनच्या वांड्सवर्थ जेलमध्ये आहे
  • ईडीने मार्चमध्ये नीरवच्या अनेक संपत्तीचा लिलाव केला होता, यातून 51 कोटी रुपये आले होते

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी (49)ची पत्नी एमी, भाऊ नेहल आणि बहिण पूर्वीविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटिस जारी केली आहे. फरार नीरवच्या पत्नीवर भारतात मनी-लॉन्ड्रिंगची तक्रार दाखल आहे. एमीला अमेरिकेत शेवटचे पाहण्यात आले होते.

ईडीने मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दाखल केलेल्या सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये एमीचे नाव सामील केले होते. तिच्यावर मनी लॉन्ड्रिंगद्वारे न्यूयॉर्कमध्ये दोन अपार्टमेंट खरेदी करुन फायदा मिळवल्याचा आरोप आहे. हे अपार्टमेंट परदेशात सीज केलेल्या 637 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचा भाग आहेत.

नीरव लंडनच्या वांड्सवर्थ जेलमध्ये आहे

नीरववर 13 हजार 700 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्याचा आरोप आहे. तो सध्या लंडनच्या वांड्सवर्थ जेलमध्ये आहे. भारताच्या अपीलवर प्रत्यर्पण वॉरंट जारी झाल्यानंतर लंडन पोलिसांनी मागच्या वर्षी 19 मार्चला त्याला ताब्यात घेतले होते. भारत सध्या नीरवच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नात आहेत. लंडनच्या एका कोर्टात सध्या सुनावनी सुरू आहे. कोर्टाने 6 ऑगस्टला नीरवची न्यायालयीन कोठडी 27 ऑगस्टपर्यंत वाढवली होती.

0