आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:अमेरिकेत जातिवाद कायद्यासाठी पुढाकार घेणाऱ्या क्षमा सावंत यांची मुलाखत

राेहित शर्मा | वाॅशिंग्टन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत जातिवाद हे कटुसत्य, सिएटल शहरात मंजूर केलेल्या जातिवादविरोधी कायद्याचा उजव्या विचारांचे करताहेत विरोध

अमेरिकेत पहिल्यांदा जातिभेद थांबवण्यासाठी कायदा बनला आहे. सिएटल शहरात असा कायदा करण्यात आला. तो बनलवला आहे सवर्ण असलेल्या हिंदू आणि नगर परिषदेच्या एकमेव सदस्या क्षमा सावंत यांनी. भास्करने क्षमा सावंत यांच्याशी अमेरिकेतील जातिभेदावर चर्चा केली.

{ अमेरिकेत विशेषत: सिएटलमध्ये तुम्हाला या कायद्याची गरज का वाटली? आमच्याकडे आकडेवारीवर आधारित विश्लेषण आहे. पूर्ण अमेरिकेत जातिभेद ही मोठी समस्या आहे. शेकडो कामगारांचे जबाब आहेत, ज्यांनी तो अनुभवला. कानर्गेगी अॅडोमंटचे संशोधन आहे. सिएटल मोठमोठ्या टेक कंपन्यांचे केंद्र आहे. येथे मोठ्या संख्येने दक्षिण आशियाई आहेत.

{यालाही विरोध होत आहे. म्हटले जातेय की हा कायदा १९६५ च्या नागरी अधिकार कायद्याचे उल्लंघन आहे? हिंदू अमेरिकन फाउंडेशन आणि हिंदूज ऑफ नाॅर्थ अमेरिकासारख्या संघटना असे बोलत आहेत. जर ते जातिभेदाचा विरोध करत असतील तर कायद्याचा का विरोध करताहेत.?

कायद्याचा दुरुपयोग होण्याची शंका उपस्थित होत असून यामुळे कंपन्या भीतीने दक्षिण आशियाई लोकांना नोकऱ्या देणे बंद करू शकतात. ? हा सर्व भ्रम आहे. यात वास्तविकता नाही. एखाद्या उच्चवर्णियाकडून कुणासोबत जातिभेद केला तरच कायद्याचा वापर होईल. तसेही सिएटलमध्ये आधीपासूनच धार्मिक किंवा राष्ट्रीयत्वाच्या भेदभावावर कायद्याने बंदी आहे. आम्ही यात केवळ आणखी एक पैलू जोडला आहे. {सिएटल सिटी काैन्सिलच्या सारा नेल्सन यांनी याच्या गरजेबाबत प्रश्न केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेत जातिभेदच नाही. अमेरिकेत अशा कायद्याची गरजच नाही.

आम्हाला उजव्या विचारसरणीकडून असा विरोध होईल, हे आधीच अपेक्षित होते. बिल ६-१ पारित झालेय. विरोधातील एक मत नेल्सन यांचेच होते. त्या श्रीमंत आणि व्यापाऱ्यांच्या समर्थक आहेत. कार्नेगी अ‍ॅडमंटने दोन्ही पद्धतींचा अभ्यास करून जातीभेद स्वीकारला आहे.

{आता डेमाेक्रेटिक पार्टी हा कायदा इतर शहरांत लागू करण्याचे धोरण आणेल? आम्हाला सर्व जगासह भारताकडून यासाठी मोठा पाठींबा मिळाला आहे. याकडे हजारो दक्षिण आशियाई कामगारांचे लक्ष लागून आहे. सिएटलकडून एकजुटीने आंदोलन करण्याचा आम्हाला आदर्श घ्यायला हवा.

बातम्या आणखी आहेत...