आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिम्बाब्वेमध्ये गुंतवणुकीचा ट्रेंड बदलला:लाेकांची बँकेऐवजी गाई, म्हशींमध्ये  गुंतवणूूक; सोन्यासाठी अनुत्सुक

हरारेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झिम्बाब्वेमधील अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. त्यामुळे जनतेचा गुंतवणुकीविषयी दृष्टिकाेन बदलला आहे. ते आपला पैसा बँकेएेवजी गाई-म्हशींमध्ये गुंतवू लागले आहेत. देशातील वाढती महागाई हेदेखील गुंतवणुकीतील बदललेल्या ट्रेंडचे कारण ठरले आहे. गेल्या वीस वर्षांत अनेक लाेकांनी आपली जमा रक्कम व निवृत्तिवेतन रक्कम बँकेमध्ये गमावली आहे. झिम्बाब्वेमधील महागाईचा दर १९२ टक्के नाेंदवण्यात आला हाेता. बँकेत पैसा ठेवण्यावरील जनतेचा विश्वास आता कमी हाेत चालला आहे. त्यासाठी उपाय शाेधले जात आहेत. पशुपालनातील गुंतवणूक त्यांच्यासाठी लाभदायी ठरू लागली आहे. तज्ज्ञांच्या दृष्टीनेदेखील ही साेन्याहून चांगली गुंतवणूक अाहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सरकारने साेन्याची नाणी काढली हाेती. ही नाणी खरेदी करण्यास लाेक उत्सुक दिसत नाहीत. झिम्बाब्वेच्या जीडीपीत ३५ टक्के ते ३८ टक्के भाग पशुपालनातून येताे. टेड एडवर्ड‌्स सिल्व्हर बँक असेट मॅनेजर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. हा एक युनिट ट्रस्ट आहे. त्याला पशुपालकांचा आधार आहे. गाई काही लाेकांसाठी सुरक्षित पर्याय ठरतात, असे एडवर्ड‌्स यांनी म्हटले आहे.

शेअर मार्केटसारखी पशूंमधील गुंतवणुकीतही जाेखीम जनावरांमध्ये गुंतवणूक करणेदेखील जाेखमीचे काम आहे. बँकेतील पैसा चलनदरामुळे अनेकदा फायदा देणारा ठरत नाही. त्याप्रमाणेच दुष्काळ, संसर्गजन्य आजारांचा फैलाव यामुळे पशूंमधील गुंतवणूक पाण्यात जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...