आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • IPhone 13 Can Get 1000 GB Storage, Masked Face Recognition Camera, Battery Capacity Will Also Increase

दिव्य मराठी विशेष:आयफोन-13 मध्ये मिळू शकते 1000 जीबी स्टोअरेज, मास्क घातलेला चेहरा ओळखेल कॅमेरा, बॅटरी क्षमताही वाढणार

कॅलिफोर्नियाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅपलचे वार्षिक लाँचिंग १४ सप्टेंबरला रात्री, काही मॉडेल्स महागणार

दिग्गज टेक्नोलॉजी कंपनी अॅपल १४ सप्टेंबरला वार्षिक लाँचिंग कार्यक्रमात अायफोन -१३ व अॅपल वॉच सिरीज ७ लाँच करणार आहे. मंगळवारी रात्री १०.३० वाजता ‘कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग’ हा व्हर्च्युअल इव्हेंट अॅपल पार्कमध्ये होईल. त्याआधी जगभरातील तंत्रज्ञान तज्ज्ञांनी आयफोनच्या लीक फीचर्सचे विश्लेषण केले आहे. सांगितले जाते की, काही मॉडेल्समध्ये १ टीबीपर्यंत (१००० जीबी) स्टोअरेज मिळू शकते. नव्या आयफोनची संभाव्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असू शकतात...

फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार नसल्याचे वृत्त, नेटवर्क नसल्यास आयफोन -१३ सॅटेलाइट सेवेला सपोर्ट करू शकतो हादऱ्यांमुळे कॅमेऱ्यावर परिणाम दरम्यान, अॅपलने इशारा दिला आहे की, जास्त क्षमतेच्या दुचाकीच्या इंजिनातून निघणाऱ्या व्हायब्रेशनच्या संपर्कात आल्यास आयफोनच्या कॅमेऱ्यावर परिणाम होऊ शकतो. कॅमेऱ्याची गुणवत्ता घसरू शकते.

कसा दिसेल : फ्रंट व बॅक पॅनल मागील मॉडेलप्रमाणे असतील. कॅमेरा बम्प किंचित जास्त असू शकतो. ४ मॉडेल्स लाँच होऊ शकतात. सर्वााधिक अपग्रेड प्रो मॉडेलमध्ये येतील. तो मॅट ब्लॅक व गोल्ड फिनिशमध्ये येऊ शकतो. त्यात फिंगरप्रिंट रेझिस्टंट फिनिशही मिळू शकते. कमी किंमत असलेला आयफोन - १३ ड्युओ पिंक कलरमध्ये येऊ शकतो. मिनी व आयफोन -१३ मध्ये लेन्स डायागोनल असू शकतात.

स्क्रीन: स्क्रीन साइझ पूर्वीसारखीच राहू शकते. फ्लॅगशिप फोन मिनी ५.४ इंच, तर आयफोन-१३ व प्रो ६.१ इंच डिस्प्लेमध्ये येऊ शकतो. प्रो मॅक्सची स्क्रीन साइझ ६.७ इंच असू शकते.

टच आयडी : आयफोन -१३ मध्ये यंदाही फिंगरप्रिंट सेन्सर दिले जाणार नसल्याचे सांगितले जाते.

किंमत: निर्मिती खर्च, महागडे मनुष्यबळ व जागतिक पुरवठा साखळीच्या तुटवड्यामुळे आयफाेन-१३ महागण्याची शक्यता आहे. आयफोन-१३ आणि १३ मिनीच्या किमती पूर्वीसारख्याच तर प्रो मॉडेल मात्र महागू शकते.

कॅमेरा : प्रो मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा व लिडार सेन्सर असेल. सर्व मॉडेल्समध्ये ३ सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील. बार्कले विश्लेषकांनुसार, चारही मॉडेल्समध्ये अल्ट्रा-वाइड लेन्स मिळू शकते. ती कमी प्रकाशातही उत्तम छायाचित्र टिपू शकते. प्रो मॅक्समधील सेन्सर-शिफ्ट स्टॅबिलायजेशन सर्व मॉडेल्समध्ये मिळू शकते. मास्क लावलेला असतानाही चेहरा ओळखता येईल, अशी यंत्रणा कॅमेऱ्यात असेल.

कॅमेरा : प्रो मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा व लिडार सेन्सर असेल. सर्व मॉडेल्समध्ये ३ सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील. बार्कले विश्लेषकांनुसार, चारही मॉडेल्समध्ये अल्ट्रा-वाइड लेन्स मिळू शकते. ती कमी प्रकाशातही उत्तम छायाचित्र टिपू शकते. प्रो मॅक्समधील सेन्सर-शिफ्ट स्टॅबिलायजेशन सर्व मॉडेल्समध्ये मिळू शकते. मास्क लावलेला असतानाही चेहरा ओळखता येईल, अशी यंत्रणा कॅमेऱ्यात असेल.

पोर्ट : आयफोनमध्ये पुढील वर्षापासून यूएसबी-सी पोर्ट मिळू शकतो. मॅगसेफ चार्जिंगमध्ये सुधारणा होईल.

स्टोअरेज : काही मॉडेल्समध्ये १ टीबीपर्यंत स्टोअरेज मिळू शकते. आयफोन-१३ व आयफोन-१३ मिनी ६४, १२८ व २५६ जीबी स्टोरेजमध्ये येईल. प्रो मॉडेल्स १२८ जीबीपासून सुरू होतील. त्यात २५६ व ५१२ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळेल.

बॅटरी : सर्व मॉडेल्सची बॅटरी क्षमता वाढू शकते. आयफोन -१२ प्रो मॅक्समध्ये ३,६८७ एमएएच बॅटरी होती. यंदाच्या माडेलमध्ये ४,३५२ एमएएच बॅटरी मिळू शकते. आयफोन-१३ व १३ प्रोमध्ये २,८१५ एमएएचऐवजी ३,०९५ एमएएच बॅटरी मिळेल. मिनी मॉडेलमध्ये २,२२७ ऐवजी २,४०६ एमएएचची बॅटरी मिळू शकते.

रॅम : रॅममध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. तथापि, मोडममध्ये सुधारणा होऊ शकते. विश्लेषकांनुसार, नवा आयफोन नेटवर्कच्या रेंजमध्ये नसल्यास थेट उपग्रह संदेशवहन सेवेचा वापर करू शकतो. त्याद्वारे इमर्जन्सी मेसेज पाठवता येऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...