आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयफाेन-13 लाँच:एक हजार जीबीपर्यंत स्टोअरेज, सिनेमॅटिक मोडही, किमतींत बदल नाही; वेगवान प्रोसेसर, बॅटरी क्षमतेतही वाढ

कॅलिफोर्निया10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ॲपलने वार्षिक सोहळ्यात 2 आयपॅड, ॲपल वॉच सिरीज-7 व 4 आयफोन केले लाँच

जगातील नंबर-१ टेक्नाॅलॉजी कंपनी ॲपलने आपला वार्षिक इव्हेंट ‘कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग’मध्ये मंगळवारी रात्री एकूण ७ उत्पादने लाँच केली. यात २ आयपॅड, ॲपल वॉच सिरीज-७ आणि ४ आयफोनचा समावेश आहे. सुमारे दीड तास चाललेल्या कार्यक्रमात कंपनीने दावा केला की, आयफोन-१३ सिरीज आजवरच्या आयफोनमध्ये सर्वाधिक वेगवान असेल. आयफोन-१३ ची मॉडेल्स १२८ जीबी, २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १,००० जीबी (१ टीबी) स्टोअरेजसोबत येतील.

नव्या मालिकेतील फोन ए-१५ बायोनिक चिपसेटने सज्ज असतील. ती इतर कंपन्यांच्या फोनच्या तुलनेत ५०% वेगवान आहे. आयफोन-१३ प्रो आणि प्रो मॅक्समध्ये आधीच्या तुलनेत जास्त क्षमतेची बॅटरी असेल. आयफोन-१३-प्रोची बॅटरी आधीच्या तुलनेत दीड तास, तर आयफोन-१३ प्रो मॅक्सची बॅटरी सुमारे अडीच तास जास्त चालेल. आयफोन-१३ च्या किमतीत बदल करण्यात आलेला नाही. आयफोन-१३ प्रो तीन नव्या रंगांत येईल. बेस मॉडेलसाठी स्टोअरेज कपॅसिटी दुप्पट करून १२८ जीबी केली आहे. बॅक साइडमध्ये कॅमेऱ्याचे लेआउट बदलले आहे. हे आयफोन नव्या सिनेमॅटिक मोडसोबत येतील. ए-१५ बायोनिक चिपसेटच्या मदतीने डाॅल्बी व्हिजन एचडीआरमध्ये शूट करता येईल. प्रथमच तिन्ही कॅमेऱ्यांत नाइट मोड वापरता येईल.

ॲपल वॉच : ३३% वेगाने चार्जिंग
ॲपल वॉच सिरीज-७ चा नवा रेटिना डिस्प्ले वॉच सिरीज ६ पेक्षा २०% मोठा आहे. सोप्या ॲक्सेससाठी बटण मोठे आहेत. ते फास्ट चार्ज यूएसबी टाइप-सी केबलसह सिरीज ६ च्या तुलनेत ३३% वेगाने चार्ज होईल. ते या वर्षअखेर उपलब्ध होईल.

आयपॅड मिनी : २९,००० रु. पासून सुरू
ॲपलने आयपॅड-९ सिरीजची सुरुवातीची किंमत ३०,९०० रु. ठेवली आहे. वायफाय मॉडेलमध्ये स्क्रीन १०.२ इंच मिळेल. आयपॅड ए-१३ चिप, १२ मेगापिक्सल कॅमेरा, ६४ जीबी स्टोअरेजसह येईल. स्क्रीन ८.३ इंच डिस्प्लेच्या आयपॅड मिनीची सुरुवातीची किंमत २९,००० रु. असेल. प्री-ऑर्डर मंगळवारपासूनच सुरू.

{ आयफोन-१३ मिनी ६९,००० रुपये तर प्री-ऑर्डर १७ सप्टेंबरपासून, विक्री २४ सप्टेंबरपासून {आयफोन-१३ ची किंमत ७९,९०० रुपये तर प्री ऑर्डर १७ सप्टेंबर, विक्री २४ सप्टेंबरपासून { आयफोन-१३ प्रोची किंमत १ लाख १९,९०० रुपये तर विक्री ३० ऑक्टोबरपासून, आयफोन-१३ प्रो मॅक्स १ लाख २९,९०० रुपये, विक्री १३ नोव्हेंबरपासून.

बातम्या आणखी आहेत...