आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या आयफोन फॅक्ट्रीत लॉकडाउन:प्रकल्पांत बंद होते शेकडो कर्मचारी, तारेच्या कुंपणावरून घरी झाले पसार

बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या झेंगझेउ (Zhengzhou) शहरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. यामुळे येथे लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे झेंगझेउ येथे आयफोनचा सर्वात मोठा कारखाना आहे. या ठिकाणी शेकडो कर्मचारी कार्यकरत होते. पण कोरोना व लॉकडाउनमुळे त्यांच्यावर कंपनीची सुरक्षा भींत ओलांडून पळून जाण्याची वेळ आली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, झेंगझेउ फॉक्सकॉनमध्ये जवळपास 3 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. जगभरातील सर्वाधिक आयफोन याच कारखान्यात तयार होतात. पण लॉकडाउनमुळे येथे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांना आर्थिक समस्येचाही सामना करावा लागत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचेही तीनतेरा वाजलेत. यामुळे नागरिकांवर पायीच आपापले घर गाठण्याची वेळ आली आहे.

कर्मचाऱ्यांनी झेंगझेउच्या फॉक्सकॉनमधील लॉकडाउन टाळण्यासाठी अॅपलची सर्वात मोठी असेम्बली साइटही नष्ट केली आहे. यामुळे आयफोनचे उत्पादन ठप्प झाले आहे. एवढेच नाही तर कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कर्मचारी 100 किमी अंतरावरील आपल्या घरी पलायन करत आहेत. दुसरीकडे, झेंगझेउमधील कोरोना रुग्णांचा आकडा अद्याप उजेडात आला नाही.

सोशल मीडियावर व्हायरल

फॉक्सकॉनच्या कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनी सुरक्षा भींत ओलांडून घरी पलायन केले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. कंपनीतील काही जणांना क्वारंटाइन करण्यात आल्यामुळे हे कर्मचारी या पद्धतीने पलायन करत असल्याचा दावा केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...