आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टरपंथी वरचढ:इस्लामी सरकारच्या क्रौर्यामुळे इराण हिजाबमध्ये; 9000 महिला तुरुंगात

तेहरानहून भास्करसाठी कामरान हकिमी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १० जणांना फाशी, आंदोलकांच्या कुटुंबीयांचा होतोय छळ

इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूला २५० दिवस झाले आहेत. १६ सप्टेंबरला तेहरानमध्ये पोलिस कोठडीत अमिनीचा मृत्यू झाला होता. हिजाब न परिधान केल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली होती. अमिनीचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. यानंतर इराणमध्ये झालेल्या हिजाबविरोधी आंदोलनात ५०० लोकांचा मृत्यू झाला. त्यात निम्म्याहून जास्त महिला आहेत. त्यांना मोहरेबेह संबोधले. त्याचा अर्थ ईश्वराविरुद्ध युद्ध छेडणे. आंदोलन प्रकरणात १० लोकांना मृत्यूदंड दिला.

तेहरानमध्ये होर्डिंग लावून हिजाब वापरण्यास सांगितले जात आहे. अॅटर्नी जनरल जफर मोंटाजेरी म्हणाले, एअरलाइन्सने हिजाबचे नियम लागू करावेत. देखरेख कॅमेरे व एआयद्वारे हिजाब न वापऱ्यांवर निगराणी ठेवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हिजाब नसेल तर महिलांना दुकानात सामान नाही
शॉपिंग मॉल: उत्तर तेहरानमधील २३ मजली ओपल शॉपिंग मॉल बंद केला आहे. कारण, तेथे बिना हिजाबच्या महिलांना परवानगी दिली होती.

आंदोलकांच्या नातेवाइकांवर अत्याचार
1 तेहरान विद्यापीठातील विद्यार्थिनी शिरीन म्हणाली, अमिनी आंदोलनावेळी अटक केली. तिच्या कुटुंबाचाही पोलिस छळ करत आहेत.तिची बहीण, आई आणि भावावरही अत्याचर केले. कुटुंबाला धमकावले जात आहे. शिरीनकडे आंदाेलनातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही.

कट्टरपंथी-सरकारचा आदेश, हिजाब वापरावाच लागेल
हिजाब प्रकरणावर मौलवी, कट्टरपंथी व सरकारचा एक सूर आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी घोषणा केली की, हिजाब हटवणे अस्वीकार्य आहे. इराणची राष्ट्रपती इब्राहिम रईसी म्हणाले होते की, हिजाब धार्मिक दृष्टीने आवश्यक आहे. कट्टरपंथी खासदार म्हणाले, हिजाब अल्लाहचा आदेश आहे. तो मानावाच लागेल.