आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइराण रशियाकडून सुखोई Su-35 लढाऊ जेट विमाने खरेदी करणार आहे. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्ही देशांदरम्यान याविषयी करार झाला आहे. संयुक्त राष्ट्रातील इराणी डिप्लोमॅटसनी म्हटले आहे - सुखोई Su-35 जेटसाठी इराणी तज्ज्ञांनी तांत्रिकदृष्ट्या मंजुरी दिली आहे. तथापि, रशियाने या कराराविषयी कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.
वास्तविक, इराणवर संयुक्त राष्ट्राने कन्व्हेन्शनल वेपन्सच्या खरेदीवर बंदी घातलेली होती. ही बंदी ऑक्टोबर 2020 मध्ये संपुष्टात आली. यानंतर रशियाने इराणला सुखोई Su-35 विकण्याचा प्रस्ताव दिला होता. तर वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या अनेक वृत्तांत दावा करण्यात आला होता की इराण आणि रशियादरम्यान 24 फायटर जेटसह अनेक लष्करी हार्डवेअर, एअर डिफेन्स सिस्टिम, मिसाईल सिस्टिम आणि हेलिकॉप्टरविषयी करार झाला आहे. याच्या आधी चीननेही रशियाकडून Su-35 फायटर जेट खरेदी केले आहेत.
रशियाकडे इराणी कामिकाझे ड्रोन
दुसरीकडे याआधी युक्रेनने दावा केला होता की रशियन सैन्य युद्धादरम्यान इराणी कामिकाझे ड्रोन्सचा वापर करत आहे. त्यांनी अनेक ड्रोन्स हाणून पाडल्याचा उल्लेख केला होता. ज्याचे तुकडे युक्रेनमध्ये सापडले होते. तथापि, रशियाने नेहमीच हे दावे फेटाळले आहेत. तर इराणने रशियाला ड्रोन्स पाठवल्याचे मान्य केले होते. मात्र त्यांच्यानुसार हा पुरवठा युद्ध सुरू होण्यापूर्वीच करण्यात आला होता.
सुखोई Su-27 चेच व्हेरिएंट आहे Su-35
Su-35 मध्ये एक डिजिटल कॉम्प्लेक्स आहे, जे स्वस्त अनगाईडेड बॉम्बचा वापर करून खूप अचूक हल्ला करू शकते. Su-35 सिंगल सीट, ट्विन इंजिन, सुखोई Su-27 फायटरचेच एक व्हेरिएंट आहे. हे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. Su-35 हे एक '4++' पिढीचे विमान आहे जे पाचव्या पिढीच्या तंत्रज्ञानाचा वापर करते. Su-35 लढाऊ विमान सुपरसोनिक वेगाने दीर्घ पल्ल्याचे उड्डाण करण्यास सक्षम आहे. हे अॅडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिमनेही सुसज्ज आहे.
इराणी कमांडरने दिली होती ट्रम्प यांना मारण्याची धमकी
यापूर्वी 24 फेब्रुवारी रोजी इराणने 1650 किमी पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्र बनवल्याची माहिती दिली होती. यादरम्यान तिथले रिव्होल्यूशनरी गार्ड एअरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमीराली हाजीजादेह यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मारण्याची धमकी दिली होती. त्यांनी म्हटले होते की आम्ही त्या सर्व मिलिट्री कमांडरना मारू इच्छितो, जे इराणी सैन्य कमांडर कासिम सुलेमानींच्या हत्येत सहभागी होते.
रशिया-इराणच्या लष्करी सहकार्यावर अमेरिका चिंतेत
अमेरिकेने इराण आणि रशियातील वाढत्या लष्करी सहकार्यावर चिंता व्यक्त केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बींनी इशारा देताना म्हटले होते की, लवकरच रशिया इराणला आपले लढाऊ जेटस विकू शकतो. 2015 मध्ये इराणच्या आण्विक कार्यक्रम थांबवण्याच्या आश्वासनानंतर संयुक्त राष्ट्राने जॉईन्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अॅक्शन करारानुसार त्याला अनेक निर्बंधांपासून दिलासा दिला होता. तथापि, 2018 मध्ये इराणसोबत अणू करार संपुष्टात आणल्यानंतर अमेरिकेने 2019 पासून इराणवर पुन्हा निर्बंध लादायला सुरुवात केली होती.
इराणकडे सोव्हिएत संघाच्या काळातील लढाऊ विमाने
इराणकडे सध्या सोव्हिएत संघाच्या काळातील रशियन मिग आणि सुखोई लढाऊ विमाने आहेत. याशिवाय त्यांच्याकडे चीनची काही विमाने आहेत. ज्यात F-7 चा समावेश आहे. सोबतच इराणकडे 1979 इस्लामिक क्रांतीच्या आधीचे अमेरिकन F-4 आणि F-5 जेटसही आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.