आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइराणचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पोलिस महिलांचे केस ओढत त्यांना अटक करताना दिसत आहेत. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या मुलींच्या या माता असल्याचे सांगण्यात येत आहे.
डिसेंबर 2022 पासून शाळकरी मुली आजारी पडल्याच्या बातम्या समोर येत होत्या. विद्यार्थिनींनी अभ्यास करू नये म्हणून त्यांना विष प्राशन दिले जात असल्याचे बोलले जात आहे. यासाठी शाळेच्या पाण्यात रसायन मिसळले जात आहे. दूषित पाणी प्यायल्याने शेकडो विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोषींऐवजी पालकांवर कारवाई
सरकारने याप्रकरणी कारवाई करावी, अशी आंदोलक पालकांची मागणी आहे. डिसेंबर 2022 मध्ये विद्यार्थिनी आजारी पडल्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र 3 महिने उलटूनही या प्रकरणात कोणीही पकडले गेले नाही. तसेच कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त पालकांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याचवेळी पोलिस दलाने पालकांनाच अटक केली.
विषबाधा झाल्याची पुष्टी
उप-आरोग्य मंत्री युनूस पनाही यांनी 27 फेब्रुवारी रोजी सांगितले की, घोम, बोरुजेर्ड सारख्या शहरांमध्ये नोव्हेंबर 2022 पासून श्वसन विषबाधाची शेकडो प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शाळांच्या पाण्यात रसायन मिसळले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत आहे. यामध्ये उलट्या होणे, शरीरातील तीव्र वेदना आणि मानसिक समस्या यांचा समावेश होतो.
मुलींच्या शाळा बंद
इराणची न्यूज एजन्सी IRNA नुसार, उप-आरोग्य मंत्री युनूस पनाही म्हणाले होते की, शाळांमध्ये विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याच्या घटनांवरून असे दिसून येते की काही लोक मुलींचे शिक्षण बंद करू इच्छितात आणि मुलींच्या शाळा बंद करू इच्छितात.
महसा अमिनीचा मृत्यू
महसा अमिनी यांच्या मृत्यूवरून 16 सप्टेंबरपासून निदर्शने सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची प्रकरणे समोर आली. प्रत्यक्षात 16 सप्टेंबर रोजी 22 वर्षीय मेहसाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. तिने हिजाब घातला नव्हता. त्यामुळे तिला अटक करण्यात आली. इराणमध्ये मुलींवर निर्बंध आहेत आणि हिजाब घालण्याबाबत कडक कायदे आहेत.
मेहसाचा मृत्यू आणि अनिवार्य हिजाबच्या विरोधात अनेक शाळकरी मुली रस्त्यावर उतरल्या. तेव्हापासून विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. सरकार आणि त्यांच्या एजन्सींवर विषप्रयोगाचा आरोप होता. या आरोपानंतर सरकारी अधिकारी म्हणाले होते की, विद्यार्थी आजारी पडले आहेत, असा आमचा विश्वास आहे. याचे कारण खराब पाणी आहे. पाण्यात बॅक्टेरिया वाढले आणि ते प्यायल्याने विद्यार्थी आजारी पडल्या.
आंदोलक विद्यार्थिनींना मनोरुग्णालयात दाखल आले इराण सरकारने तर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना मानसिक आजारी घोषित केले आहे. हिजाबला विरोध करणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन मुलींची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे इराणच्या शिक्षणमंत्र्यांनी म्हटले होते.
ते म्हणाले होते की, या सर्व विद्यार्थिनी मानसिक आजाराने त्रस्त आहेत. या विद्यार्थिनींना मनोरुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. जेणेकरून या विद्यार्थिनींमध्ये जो समाजविघातक वर्तन फोफावत आहे, ते सुधारता येईल.
इराणी मुलींनी जाळले हिजाब; इस्लामिक क्रांतीने कसे बदलले इराणी महिलांचे जीवन?
इराणमध्ये महिला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. हिजाबला हवेत फेकत त्या इराणमधील धार्मिक पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. पोलिसांच्या मारहाणीमुळे 22 वर्षीय महसा अमीनी हीचा मृत्यू झाल्याने महिला संतापल्या आहेत. तीचा दोष एवढाच होता की, तिने हिजाब नीट परिधान केलेला नव्हता. इराणी महिलांना हिजाब घालण्याची अट 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर लागू झाली. त्यापूर्वी, शाह पहलवीच्या राजवटीत इराण स्त्रियांच्या पोशाखाच्या बाबतीत पूर्णपणे स्वतंत्र होता. भारतात मुस्लिम मुलींनी हिजाब घालण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.दिव्य मराठी एक्स्प्लेनरमध्ये आज आपण 1979 च्या इस्लामिक क्रांतीपूर्वी आणि नंतर इराणमधील महिलांच्या जीवनातील बदलांबद्दल जाणून घेणार आहोत...येथे वाचा संपुर्ण बातमी.
शरीर उघडे दिसताच महिलांना ताब्यात घ्यायचे सदाचरण पोलिस
13 सप्टेंबर 2022 चा दिवस होता. इराणच्या कुर्दिस्तान प्रांतातील 22 वर्षीय महसा अमिनी एक लांब ओव्हरकोट परिधान करून तेहरानमध्ये आपल्या कुटुंबासह फिरत होत्या. कुटुंब शहीद हेगाणी एक्स्प्रेस वेवर पोहोचताच सदाचरण पोलिस दाखल झाले. सदाचरण पोलिसांनी अमिनींचा पोशाख अशोभनीय ठरवून त्यांना ताब्यात घेतले. अमिनींनी हिजाब नीट परिधान केलेला नसल्याचा दावा पोलिसांनी केला. यानंतर अमिनींना एका व्हॅनमधून डिटेन्शन सेंटरमध्ये नेले जाते. येथे वाचा संपुर्म बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.