आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • Iran Hijab Protest Iran Govt Abolished Morality Police After Mahsa Amini Death, Latest News And Update

इराणमध्ये नैतिक पोलिसिंग संपुष्टात:2 महिन्यांपासून सुरू असणाऱ्या 'हिजाब'विरोधी आंदोलनानंतर निर्णय, आतापर्यंत 300 जण ठार

तेहरान2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

इराण सरकारने वादग्रस्त नैतिक पोलिसिंग रद्दबातल करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात 16 सप्टेंबर रोजी 22 वर्षीय महसा अमिनीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर हिजाब विरोधी आंदोलन सुरू झाले होते. यासंबंधीच्या वृत्तानुसार, या आंदोलनात आतापर्यंत जवळपास 300 जण ठार झालेत. तर हजारोंना तुरुंगात डांबण्यात आले आहे.

नैतिक पोलिसिंग अंतर्गत इस्लामी कायद्यांनुसार वस्त्र परिधान न करणाऱ्या व शरिया कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते.

सरकार काय म्हणाले?

 • अटॉर्नी जनरल मोहम्मद जफर मोंताजेरी इराणी वृत्तसंस्थेला बोलताना म्हणाले - नैतिक पोलिसिंगचा न्यायपालिकेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे आम्ही तो रद्दबातल करत आहोत.
 • जफर राजधानी तेहरानमध्ये आयोजित एका धार्मिक परिषदेत बोलत होते. येथे त्यांना या पोलिसिंगवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
 • स्थानिक भाषेत या मॉरेलिटी पोलिसिंग अर्थात नैतिक पोलिसिंगला ‘गश्त-ए-एरशाद’ म्हटले जाते. इंग्रजीत त्याचा अर्थ गायडेंस पेट्रोलिंग असा होतो. 2006 मध्ये राष्ट्रपती मोहम्मद अहमदीनेजाद यांनी याची सुरुवात केली होती.
 • राष्ट्राध्यक्ष हसन रूहाणी यांच्या काळात पेहरावाविषयी काही सवलत देण्यात आली. त्याअंतर्गत महिलांना सैल जीन्स व कलरफूल हिजाब घालण्याची परवानगी देण्यात आली होती. पण गत जुलैमध्ये इब्राहिम रईसी यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पुन्हा हा जुना कठोर कायदा लागू केला.

कसे पेटले आंदोलनाचा?

 • 13 सप्टेंबर रोजी 22 वर्षीय महसा अमिनी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तेहरानला आली होती. तिने हिजाब घातला नव्हता. पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.
 • सरकारच्या मॉरल पोलिसिंगविरोदात तरुणांनी गरशाद नामक मोबाइल अॅप तयार केले. हे अॅप आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोकानी डाउनलोड केले आहे. तरुण त्याच्या माध्यमातून सीक्रेट मेसेजचे आदान-प्रदान करत होते. हे पाहून तेहरानमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही हे आंदोलन उग्र होत गेले.
 • इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, अमिनी अटकेनंतर काही तासांतच कोमात गेली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. कुटुंबीयांच्या मते, तिला कोणता आजारही नव्हता. तिची प्रकृती अत्यंत ठणठणीत होती. त्यामुळे तिचा मृत्यू संशयास्पद आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, महसाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला आहे. पण याची अद्याप पुष्टी झाली नाही. इराणमधील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांवर नजर ठेवणाऱ्या एका वाहिनीने अमिनीचा मृत्यू डोक्याला इजा झाल्यामुळे झाल्याचा दावा केला आहे.

हिजाब घालणे 1979 च्या इस्लामी क्रांतीनंतर सक्तीचे

इराणमध्ये हिजाब 1979 मध्ये बंधनकारक करण्यात आला. पण 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी एका आदेशावर स्वाक्षरी करून तो ड्रेस कोड म्हणून लागू करण्याचा निर्णय घेतला. 1979 पूर्वी शाह पहलवी यांच्या कारकिर्दीत महिलांच्या कपड्यांच्या बाबतीत इराण स्वतंत्र विचारांचा होता.

 • 8 जानेवारी 1936 रोजी रजा शाह यांनी कश्फ ए हिजाब लागू केला. म्हणजे एखाद्या महिलेने हिजाब घातला तर पोलिस तो काढून टाकतील.
 • 1941 मध्ये शाह रजा यांचा मुलगा मोहम्मद रजाने इराणची सूत्रे हाती घेतली व कश्फ ए हिजाबवर बंदी घातली. त्यांनी महिलांना स्वतःच्या पसंतीनुसार ड्रेस घालण्याची परवानगी दिली.
 • 1963मध्ये मोहम्मद रजा शाह यांनी महिलांना मताधिकार प्रदान केला. त्यामुळे महिलांची संसदेवर निवड होण्यास सुरुवात झाली.
 • 1967मध्ये इराणच्या पर्सनल लॉमध्येही सुधारणा करण्यात आली. त्यात महिलांना समानतेचे अधिकार प्रदान करण्यात आले.
 • मुलींचे लग्नाचे वय 13 वरून 18 वर्षे करण्यात आले. तसेच गर्भपाताला कायदेशीर मान्यता देण्यात आली.
 • शिक्षणातील मुलींची भागीदारी वाढवण्यावर जोर देण्यात आला. 1970 च्या दशकापर्यंत इराणच्या विद्यापीठांतील मुलींची भागीदारी 30% होती.
 • 1979 साली शाह रजा पहलवी यांना देश सोडून जावे लागले. त्यानंतर इराण इस्लामिक रिपब्लिक झाला. शियांचे धार्मिक नेते आयोतोल्लाह रुहोल्लाह खोमेनी यांची इराणच्या सुप्रीम लीडरपदी नियुक्ती झाली. येथूनच इराण जगातील शिया मुस्लिमांचा बालेकिल्ला बनला. खोमेनी यानी महिलांचे अधिकार अत्यंत कमी केले.
बातम्या आणखी आहेत...