आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर उतरवला हिजाब:लिहिले- कदाचित हा माझा अखेरचा व्हिडिओ असेल; एका दिवसानंतर अटक

तेहरान11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमध्ये दोन महिन्यांपासून हिजाबविरोधी निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना अटक केली आहे. दोघीही इराणमध्ये होत असलेल्या निदर्शनांच्या समर्थनार्थ पुढे आल्या. हेंगमेह गजियानी आणि कातायुन रियाही यांना सरकारविरोधात जाण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

एएफपी वृत्तसंस्थेनुसार, दोन्ही अभिनेत्रींनी हिजाबच्या निषेधाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. याच्या एका दिवसानंतर त्यांना अटक करण्यात आली. 16 सप्टेंबर रोजी 22 वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूनंतर निदर्शने सुरू झाली. हिजाब न घातल्याने पोलिसांनी महसाला अटक केली होती. तिला कोठडीत आपला जीव गमवावा लागला होता.

सक्तीच्या हिजाबच्या निषेधार्थ इराणमधील महिला त्यांचे हिजाब जाळत आहेत आणि केस कापत आहेत.
सक्तीच्या हिजाबच्या निषेधार्थ इराणमधील महिला त्यांचे हिजाब जाळत आहेत आणि केस कापत आहेत.

हेंगामेह गजियानीने हिजाबविना पोस्ट केला व्हिडिओ

52 वर्षीय हेंगामेह गजियानीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने हिजाब घातला नव्हता. या व्हिडिओसोबत तिने लिहिले होते- हा कदाचित माझा शेवटचा व्हिडिओ आहे. मला एवढेच सांगायचे आहे की, या क्षणानंतर माझ्यासोबत काहीही झाले तरी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इराणच्या लोकांच्या पाठीशी आहे.

हा व्हिडिओ गजबजलेल्या भागात शूट करण्यात आला आहे. यामध्ये हेंगामेह गजियानी त्यांचा हिजाब काढून केस बांधताना दिसल्या होत्या.
हा व्हिडिओ गजबजलेल्या भागात शूट करण्यात आला आहे. यामध्ये हेंगामेह गजियानी त्यांचा हिजाब काढून केस बांधताना दिसल्या होत्या.

सरकारवर केला होता हत्येचा आरोप

गेल्या आठवड्यात हेंगमेह गजियानी यांनी दुसर्‍या पोस्टमध्ये सरकारवर 50 तरुणांची हत्या केल्याचा आरोप केला आणि त्यांना चाइल्ड किलर म्हटले. काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, या आंदोलनात आतापर्यंत 400 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक तरुणांचाही समावेश आहे. सुमारे 16,800 लोकांना अटक करण्यात आली आहे.

आंदोलन करणाऱ्या पहिल्या अभिनेत्रीलाही अटक

महसा अमिनीच्या मृत्यूनंतर 60 वर्षीय कातायुन रियाही हिजाबशिवाय सार्वजनिकपणे दिसणारी पहिली अभिनेत्री आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सक्तीच्या हिजाबच्या विरोधात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. सप्टेंबरमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून अनेक अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मित्रा हज्जर, बरन कोसरी आणि तराणेह अलीदोस्ती यांच्या अटकेचा समावेश आहे.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, तेहरान कोर्टाने हिजाबविरोधी 5 आंदोलकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, तेहरान कोर्टाने हिजाबविरोधी 5 आंदोलकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

हिजाब अनिवार्य करण्याऐवजी ऐच्छिक करावा, अशी मागणी आंदोलक महिला करत आहेत. हिजाबमुळे त्यांना मारले जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

आता सत्तापालटाची भीती वाढली

सत्तापालट होण्याची भीती बळावली आहे. अशा स्थितीत इराणच्या लष्करी रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या सर्वोच्च कमांडर्सनी त्यांच्या कुटुंबीयांना कॅन्टोन्मेंट भागातून सुरक्षित ठिकाणी पाठवले आहे. तेहरानमधील तेल कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये कुटुंबांना चोवीस तास सुरक्षा पुरवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निदर्शने सुरू राहिल्यास किंवा सत्तापालट झाल्यास त्यांना सुरक्षितपणे शेजारच्या जॉर्जियाला पाठवले जाईल, असे आश्वासन या कुटुंबांना देण्यात आले आहे.

1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर हिजाब घालण्याची सक्ती लागू

इराणमध्ये 1979 मध्ये हिजाब अनिवार्य करण्यात आला असला तरी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी 15 ऑगस्ट रोजी एका आदेशावर स्वाक्षरी केली आणि ड्रेस कोड म्हणून त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले. 1979 पूर्वी शाह पहलवीच्या राजवटीत इराण स्त्रियांच्या कपड्याच्या बाबतीत खूप उदारमतवादी होता.

  • 8 जानेवारी 1936 रोजी रझा शाह यांनी कश्फ-ए-हिजाब लागू केला. म्हणजेच एखाद्या महिलेने हिजाब घातला, तर पोलिस ते काढून घेतील.
  • 1941 मध्ये शाह रझा यांचा मुलगा मोहम्मद रझा याने सत्ता ताब्यात घेतली आणि कशफ-ए-हिजाबवर बंदी घातली. त्याने महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याची परवानगी दिली.
  • 1963 मध्ये मोहम्मद रझा शाह यांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला आणि महिला संसदेतही निवडून आल्या.
  • 1967 मध्ये इराणच्या वैयक्तिक कायद्यातही सुधारणा करण्यात आली ज्यामध्ये महिलांना समान अधिकार मिळाले.
  • मुलींचे लग्नाचे वय 13 वरून 18 वर्षे करण्यात आले. तसेच गर्भपात हा कायदेशीर अधिकार करण्यात आला.
  • मुलींचा शिक्षणातील सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला. 1970 पर्यंत इराणच्या विद्यापीठात मुलींची नोंदणी 30% होती.

शाह रझा पहलवी यांना 1979 मध्ये देश सोडावा लागला आणि इराण हे इस्लामिक रिपब्लिक बनले. शिया धर्मगुरू अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांना इराणचे सर्वोच्च नेते बनवण्यात आले. येथून इराण हा जगातील शिया इस्लामचा बालेकिल्ला बनला. खोमेनी यांनी स्त्रियांचे अधिकार खूप कमी केले.

बातम्या आणखी आहेत...