आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्व इराणमध्ये एक प्रवासी ट्रेन रुळावरून घसरली आहे. इराणच्या सरकारी टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी पॅसेंजर ट्रेनचे 4 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, इराणमधील तबास या वाळवंटी शहराजवळ सकाळी ट्रेनच्या सातपैकी चार बोगी रुळावरून घसरल्या असून बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि 3 हेलिकॉप्टर उपस्थित आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.
कुठे झाला अपघात
राजधानी तेहरानपासून सुमारे 550 किलोमीटर (340 मैल) अंतरावर असलेल्या तबास शहराच्या आग्नेयेस किमान 30 मैल अंतरावर रेल्वे अपघात झाला आहे. हे ठिकाण तबस शहराला यझद शहराशी जोडते. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रेन एका एक्स्कॅव्हेटरला धडकल्याचे समजते.
यापूर्वीचे रेल्वे अपघात
याआधी 2004 मध्ये सर्वात धोकादायक रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात 320 जणांचा मृत्यू झाला होता. तर 460 जण जखमी झाले होते. पेट्रोल, खत, सल्फरने भरलेल्या रेल्वेचा नेशाबूर शहराजवळ अपघात झाला होता. तर 2016 मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 40 हून अधिक लोक जखमी झाले होते.
नियम पाळत नाहीत
इराण हा जगातील सर्वात वाईट वाहतूक सुरक्षा रेकॉर्ड असलेल्या देशांपैकी एक आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणे, असुरक्षित वाहने आणि आपत्कालीन सेवांचा अभाव ही इराणमधील अपघातांची प्रमुख कारणे आहेत. इराणच्या महामार्गावर अनेकदा लोक वाहतुकीचे नियम तोडताना दिसतात. त्यामुळे अनेकदा अपघात होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.