आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राइक:इराणने पाकिस्तानात घुसून 3 वर्षांपूर्वी अपहरण केलेल्या दोन सैनिकांची सुटका केली

तेहरानएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इराणी सैनिकांचे 2018 मध्ये केले होते अपहरण

पाकिस्तानमध्ये आणखी एक सर्जिकल स्ट्राइक झाल्याचे वृत्त गुरुवारी समोर आले. 2 फेब्रुवारीच्या रात्री इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याचा रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे. इराणी सैनिकांनी 3 वर्षांपूर्वी दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना जैश-अल-अदल यांनी अपहरण केलेल्या त्यांच्या 2 सीमा रक्षकांची सुटका केली.

इराणी सैन्याने आपली मोहीम यशस्वी झाल्याचे सांगितले

इराणने पाकिस्तानी सैन्याला या कारवाईबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. 3 फेब्रुवारी रोजी आपले मोहीम यशस्वी झाल्याचे आणि सैनिकांना मुक्त केल्याची माहिती दिली. जैश-अल-अदल दहशतवादी संघटना दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमध्ये सक्रिय आहे आणि इराणच्या सैन्याने या भागात सर्जिकल स्ट्राईक केल्याचे समजते.

इराणी सैनिकांचे 2018 मध्ये केले होते अपहरण

जैश-अल-अदल दहशतवादी संघटना इराणच्या दक्षिण-पूर्व भागात हल्ले करत असतो. या संघटनेने फेब्रुवारी 2019 मध्ये याच भागात इराणी सैनिकांच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक इराणी सैनिक ठार झाले होते. ऑक्टोबर 2018 मध्ये या दहशतवादी संघटनेने . इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील मिर्झावेह सीमेवरून 14 इराणी सैनिकांचे अपहरण केले होते. यातील 5 सैनिकांना एका महिन्यानंतर सोडले होते.

भारत आणि अमेरिका यांनी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला आहे

पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक करणारा इराण तिसरा देश आहे. इराणच्या आधी अमेरिकेने 2 मे 2011 रोजी पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत अलकायदाचा म्होरक्या लादेनचा खात्मा केला होता. त्यानंतर भारताने देखील सप्टेंबर 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राइक केले होते. 14 फेब्रुवारी 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने त्याचवर्षी 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केले होते.

बातम्या आणखी आहेत...