आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:इराणच्या मौलवींचा सरकारला प्रस्ताव : लग्न न करणाऱ्यांना कर लावा, लोक म्हणाले : ज्यांनी केले त्यांना काय फायदा?

तेहरान10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ढासळती अर्थव्यवस्था व बेरोजगारीमुळे इराणमध्ये लग्नाचे सरासरी वय वाढले, जन्मदरातही घट

इराणमध्ये जन्मदर घसरत असताना धर्मगुरू मोहंमद इद्रिसी यांनी संसद व प्रशासनाला अनोखा प्रस्ताव सादर केला आहे. ते म्हणाले, लग्न न करणाऱ्यांकडून कर आकारण्यात यावा. तसेच ज्यांचे वयाच्या २८ व्या वर्षांपर्यंत लग्न होत नाही, त्यांच्याकडून एका दांपत्याच्या लग्नासाठी लागणारा खर्च कररूपात आकारला जावा. सोबतच अविवाहितांना उच्च व्यवस्थापकीय पदांवर किंवा विद्यापीठांमध्ये शिकवण्यासारखी महत्त्वाची भूमिका देऊ नये. देश बळकट होण्यासाठी सैन्यात जवानांची संख्या वाढवणे त्यांच्या प्रस्तावाचा हेतू आहे. दरम्यान, धर्मगुरूंच्या या प्रस्तावामुळे इराणच्या युवकांना गमतीशीर मुद्दा मिळाला आहे. ट्विटरवर कम्पल्सरी मॅरेज या हॅशटॅगसह लोक प्रतिक्रिया देत आहेत. एक युजर तर लग्नासाठी २८ वर्षांच्या अटीवर म्हणाली, हे लागू झाले तर मी सर्वात आधी एक कार किंवा घराच्या पुरस्कारासाठी पात्र ठरेन. कारण मी १८ व्या वर्षीच लग्न केले आहे. तर मला याचा फायदा होईल का?

तरुणांना नोकरीवरून काढण्याची धमकी, बालविवाहदेखील वाढले

इराणमध्ये लग्न व मुले जन्माला घालण्यावर सरकार सक्ती दाखवत आहे. २८ वयानंतर लग्न केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जात आहे. मोठ्या प्रमाणात बालविवाह लावले जात आहेत. १४ वर्षांची झाल्याबरोबर मुलींवर लग्न करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. २०१९ मध्येदेखील बालविवाह रोखण्यासाठी संबंधित एक विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...