आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२२ वर्षीय महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सुरू झालेल्या महिलांच्या हिजाबविरोधी आंदोलनास यश आले आहे. इराणच्या सरकारी महाधिवक्त्यांनी रविवारी नैतिकता पोलिसिंग (मोरॅलिटी पोलिसिंग) बंद करण्यात आल्याची घोषणा केली. मोरॅलिटी पोलिसांचा न्यायपालिकेशी कोणताही संबंध नसल्याने ते बंद करण्यात येत आहे, अशी घोषणा अॅटर्नी जनरल मोहंमद जफर मोंताजेरी यांनी केली. तसेच हिजाबच्या अनिवार्यतेशी संबंधित जुनाट कायद्याचे पुनरावलोकन करण्याचे संकेतही दिले आहेत.
इराणमध्ये हिजाब परिधान करणे महिलांसाठी बंधनकारक ओहे. हिजाब व्यवस्थित परिधान न केल्याबद्दल तेहरानच्या मोरॅलिटी पोलिसांनी महसा अमीन या तरुणीस ताब्यात घेतले होते. तीन दिवसांनंतर १६ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट उसळली हाेती.
काय आहे नैतिकता पोलिस ? इराणमध्ये याला ‘गश्त-ए-इरशाद’ म्हणतात. सन २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहंमद अहमदीनेजाद यांनी त्याची सुरुवात केली होती. सन १९८३ पासून इराणमध्ये हिजाब परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.