आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इराणचे मुख्य अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांची रिमोटने ऑपरेट होणाऱ्या मशीनगनने हत्या करण्यात आली होती. इराणची वृत्तसंस्था फार्सने हा खुलासा केला आहे. यापूर्वी इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएवर या हत्येचे आरोप करण्यात आले आहे. या हत्येचा बदला घेणार असल्याचे इराणच्या काही मुख्य नेत्यांनी म्हटले आहे. वृत्तानुसार, फखरीजादेह एक बुलेटप्रूफ कारमध्ये पत्नीसोबत बाहेर जात होते. तेव्हा कारला गोळी लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर काय झाले आहे, हे जाणून घेण्यासाठी गाडी थांबवून बाहेर आले. त्याच वेळी १५० मीटर अंतरावर असलेल्या एका कारमध्ये बसवलेल्या मशीनगनने त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीरात तीन गोळ्या घुसल्या होत्या. त्यांच्या सुरक्षा रक्षकालाही गोळी लागली. आश्चर्य म्हणजे, मशीनगन बसवण्यात आलेली कारही स्फोटात उडवण्यात आली. इराणची आणखी एक वृत्तसंस्था आयएसएनएनुसार, शास्त्रज्ञांच्या कारलाही गोळी लागली होती. यानंतर त्यांच्यावर गोळीबार झाला.
हे वृत्त इराणच्या संरक्षणमंत्र्यांच्या हवाल्याने प्रकाशित करण्यात आले आहे. मात्र, इराणची सरकारी वाहिनी आयआरआयबीच्या वृत्तानुसार, आधी स्फोट झाला व नंतर गोळीबार झाल्याचे म्हटले आहे. इराणचे आंतरराष्ट्रीय प्रकरणांसंदर्भातील समितीचे प्रमुख सय्यद कमार खराजी यांनी ही हत्या इराणी लष्कराचे सर्वोच्च नेते कासीम सुलेमानी यांच्या हत्येप्रमाणे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, या हत्येचा कट रचणाऱ्यांना इराण योग्य वेळेवर उत्तर देईल. इराणने या प्रकरणी इस्रायलला जबाबदार धरले आहे.
तीन महिन्यांत अणुबॉम्ब बनवणार होता इराण : माजी यूएन तज्ज्ञ
मुख्य अणुशास्त्रज्ञांच्या हत्येनंतर इराण अणुबॉम्ब बनवण्याचा जवळ पोहोचल्याचे म्हटले जात आहे. याबाबत संयुक्त राष्ट्र संघाचे माजी शस्त्र निरीक्षक डेव्हिड अलब्राइट म्हणाले, इराण ३.५ महिन्यांत अणुबॉम्ब बनवू शकतो. अलब्राइट दीर्घकाळापासून इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमांवर नजर ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी इराणला १००० अॅडव्हान्स सेंट्रिफ्यूजचा वापर करावा लागला असता. २०१६ मध्ये झालेल्या आण्विक करारानंतर इराणने आपले सेंट्रिफ्यूज हटवले होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी करार मोडल्यानंतर इराण या दिशेने काम करत असल्याचे म्हटले जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.