आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Iranian President Interview Vs Christiane Amanpour Hijab Row । Protest Across Iran 15 Cities । CNN Anchor Refuses To Wear Hijab In New York

हिजाब घालून मुलाखत घेण्यास CNN अँकरचा नकार:इराणच्या राष्ट्रपतींची मागणी धुडकावली, क्रिस्टीन यांची जगभरात चर्चा

न्यूयॉर्क13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी हे सध्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. यादरम्यान, बुधवारी त्यांची CNN या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील अँकर क्रिस्टीन एमनपोर मुलाखत घेणार होत्या. मात्र, त्यांची मुलाखत होऊ शकली नाही. राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी क्रिस्टीन यांच्यासमोर हिजाब परिधान करून मुलाखत घेण्याची अट ठेवली होती. क्रिस्टीन यांनी राष्ट्रपतींची मागणी फेटाळून लावली आणि येथे असा कोणताही नियम नसल्याचे सांगितले. त्यामुळेच मुलाखत होऊ शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिस्टीन एमनपोर या इराणी महिला आहेत. त्या राजधानी तेहरानमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या CNN मध्ये अँकर आहेत आणि पर्शियन स्पीकर आहेत. राष्ट्रपतींच्या हिजाब परिधान करून मुलाखत घेण्याच्या मागणीवर क्रिस्टीन म्हणाल्या की, जेव्हा त्या इराणमध्ये रिपोर्टिंग करत होत्या तेव्हा तिथल्या कायद्याचे आणि रीतिरिवाजांचे पालन करण्यासाठी त्यांनी हिजाब परिधान केला होता.

क्रिस्टीन म्हणाल्या- ज्या देशात राहते तेथे असे नियम नाहीत

क्रिस्टीन यांनी सांगितले की, मी आता अशा देशात आहे, जिथे मुलाखतीसाठी हिजाब घालण्याचे कोणतेही नियम नाहीत. त्यांनी राष्ट्रपतींना नम्रपणे सांगितले की, त्या कोणत्याही इराणी अधिकाऱ्याच्या मुलाखतीला हिजाब घालणार नाहीत. त्या म्हणाल्या की, 1995 पासून त्यांनी अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या, पण त्यांना हिजाब घालण्यास कधीही सांगितले गेले नाही.

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी सांगितले की, जेव्हा अँकर हिजाब घालून येईल तेव्हाच मुलाखत होईल.
इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी सांगितले की, जेव्हा अँकर हिजाब घालून येईल तेव्हाच मुलाखत होईल.

इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर बदलले हे नियम

इराणच्या कायद्यानुसार सर्व महिलांनी डोके झाकणे आणि सार्वजनिक ठिकाणी सैल कपडे घालणे बंधनकारक आहे. हा नियम इराणमध्ये 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर लागू करण्यात आला, जो देशातील प्रत्येक महिलेसाठी अनिवार्य आहे. यात पर्यटक, राजकीय व्यक्ती आणि पत्रकारांचाही समावेश आहे.

इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने 15 शहरांमध्ये पसरली, आतापर्यंत 31 ठार, 1 हजार अटकेत

16 सप्टेंबरपासून इराणमध्ये हिजाबच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनात महिलांसोबत पुरुषही सहभागी झाले होते. आता हे आंदोलन 15 शहरांमध्ये पसरले आहे. पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमकही सुरू आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. गुरुवारी झालेल्या गोळीबारात तीन आंदोलकांचा मृत्यू झाला होता. 5 दिवसांत मृतांचा आकडा 31 वर गेला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत.

1000 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. सरकारच्या मॉरल पोलिसिंगच्या विरोधात तरुणांनी गरशाद नावाचे मोबाइल अॅप बनवले आहे. 5 दिवसांत 10 लाख लोकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. यातून तरुणांना गुप्त संदेश पाठवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर तेहरानमध्ये मोबाइल इंटरनेट बंद करण्यात आले असून इन्स्टाग्राम ब्लॉक करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...