आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराण:युद्ध नौकेने परीक्षणादरम्यान चुकून आपल्याच जहाजाला निशाना बनवले, 20 पेक्षा जास्त नाविकांचा मृत्यू

तेहरानएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिक मीडियानुसार, युद्धनौका जमरान एंटी शिप मिसाइलचे परीक्षण करताना हा अपघात झाला

इराणची युद्ध नौका जमरानने फ्रेंडली फायरमध्ये चुकून आपल्या देशाचे जहाज कोनाराकला निशाना बनवले. या दुर्घटनेत 20 पेक्षा जास्त नाविकांचा मृत्यू झाला आहे. कोनाराकवर 30 ते 40 क्रू मेंबर्स होते. हे नुकते इराणच्या नौसेनेत सामील झाले होते.

आयआरजीसीने याला मानवी चूक सांगितले

न्यूज एजेंसी अनाडोलुने सांगितल्यानुसार, अपघातात जहाजच्या कमांडरचाही मृत्यू झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) ने या घटनेलामानवी चूक म्हटले आहे. परंतू, इराणच्या सेनेकडून अद्याप कोणतेच अधिकृत स्पष्टीकरण आले नाही. सूत्रांनी सांगितल्यानुसार, इराणी नौसेना पुढील काही तासात स्पष्टीकरण देईल. स्थानिक पत्रकारांचे म्हणने आहे की, युद्धनौका जमरान नलीन अँटी शिप मिसाइलचे परीक्षण करत होती, यात लॉजिस्टिक शिप कोनाराक आली.

जखमी नाविकांना रुग्णालया दाखल केले

रिपोर्टनुसार, आयआरजीसीकडून मिसाइल ठरलेल्या वेळेपूर्वीच निघाली, तोपर्यंत कोनाराक लक्ष्यापासून दूर गेलेली नव्हती. सोशल मीडियावर पोस्ट आलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, जखमी नाविकांना रुग्णालयात नेले जात आहे. जानेवारीमध्येही आयआरजीसीन चुकीने तेहरानजवळील यूक्रेनच्या एका प्रवासी विमानाला निशाना बनवले होते, यात 176 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...