आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराक:आजारपणाचे नाटक...गर्दी होताच स्वत:ला उडवले; 28 ठार

बगदाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र इराकची राजधानी बगदादचे आहे. आत्मघाती हल्लेखोरांनी मध्य बगदादमध्ये स्वत:ला उडवून लावले. त्यात २८ जणांचा मृत्यू झाला तर ७३ लोक जखमी झाले. २०१७ मध्ये इस्लामिक स्टेट या संघटनेचा पाडाव झाला होता. त्यानंतर या भागात इसिसने हल्ला केला नव्हता. हल्ल्यामागे इसिस असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यापूर्वी हल्लेखोर बाजारपेठेत घुसले.

या दहशतवाद्यांनी आजारी असल्याचे नाटक केले. हे पाहून लोक मदतीसाठी धावले त्याच वेळी हल्लेखोराने स्वत:ला स्फोटकांनी उडवले. दुसरा हल्लेखोर घटनास्थळी दुचाकीने आला व त्यानेही स्फोट घडवला. ही घटना अल-शरजी भागातील बाजारपेठेत घडली.

बातम्या आणखी आहेत...