आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Iraq Suicide Attack News Photos Updates; 35 Killed, 60 People Injured In Sadr City; News And Live Updates

ईदपूर्वीच इराकमध्ये आत्मघातकी हल्ला:बॉम्ब स्फोटात 35 ठार, 60 पेक्षा जास्त जखमी; हल्ल्याची जबाबदारी IS च्या दहशतवादी संघटनेने स्विकारली

सदरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

इराकच्या सदर शहरात झालेल्या आत्मघाती बॉम्ब स्फोटात 35 लोक ठार झाले आहे. दरम्यान, या बॉम्ब स्फोटात 60 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सोमवारी सांयकाळी इराकमधील सदर शहरात घडली आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयएस (IS) या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे. दहशतवाद्यांनी स्वत:ला बॉम्बव्दारे उडवून घेतले आहे. आयएसचे म्हणणे आहे की, उद्या मंगळवारी ईद असल्याने सदर शहरातील बाजारात मोठी गर्दी होती. त्यामुळे दहशतवाद्यांनी हे ठिकाणी निवडल्याचे टेलिग्रामव्दारे सांगितले. .

स्फोटानंतर बाजारात चेंगराचेंगरी झाल्याने बरेच लोक जखमीही झाले.
स्फोटानंतर बाजारात चेंगराचेंगरी झाल्याने बरेच लोक जखमीही झाले.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात बरेच लोक गंभीर जखमी झाले असून यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण जखमीपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. जखमी लोकांना उपचारसाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

पंतप्रधानांनी बोलावली आपत्कालीन बैठक
या हल्ल्यानंतर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधेमी यांनी सुरक्षा कमांडर्सची आपत्कालीन बैठक बोलावली. तर दुसरीकडे इराकचे राष्ट्रपती बरहाम सालेह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, एका भयंकर गुन्ह्यासह काही लोकांनी ईदच्या आधी सदर शहरातील नागरिकांना लक्ष्य करायचे होते. जोपर्यंत या दहशतवादाचे उच्चाटन होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.

7 महिन्यांत आयएसचा दुसरा आत्मघातकी हल्ला
इराकमधील सदर शहरात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी​​​​​​​ आयएसने घेतली आहे. विशेष म्हणजे आयएसने 7 महिन्यांत दुसऱ्यांदा आत्मघातकी हल्ला घडवून आणला आहे. यापूर्वीचा हल्लादेखील याच शहरात करण्यात आला होता. ज्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू तर 20 लोक गंभीर जखमी झाले होते. त्याचबरोबर जानेवारीत मध्य बगदाद टेरान स्क्वेअर मार्केटमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्याची जबाबदारीही आयएसने स्वीकारली होती. या स्फोटात 30 लोक ठार झाले होते.

बातम्या आणखी आहेत...