आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियात सागरी अभियान:जहाजातून लोह खनिज खाणींचा धांडोळा

जकार्ता19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र इंडोनेशियातील सुंगई लियाटच्या मत्रास बेट परिसरातील आहे. या भागात खाण कामगारांच्या माध्यमातून लोह खनिज खाणींचा माग काढला जात आहे. या कामासाठी शेकडो कामगारांचे गट सक्रिय आहेत. खनिज शोधण्याचे काम सुमारे ३० नाॅटिकल मील क्षेत्रात सुरू आहे. जगभरात सध्या इंडोनेशियातील धातूंची मागणी वाढली.चीनमधून पुरवठ्यात घट, गुणवत्तेनेे इंडोनेशियास लाभ झाला. इंडोनेशियाने उत्पादन वाढवण्यासाठी जमिनीनंतर सागरी क्षेत्राचा धांडोळा घेण्यास सुरूवात केली. तसे तर जगातील कोळसा निर्यात करणाऱ्या सर्वांत मोठ्या देशांत इंडोनेशियाचा समावेश आहे. इंडोनेशियामधून निघणाऱ्या कोळशाचा भारत हा सर्वात मोठा आयातदार आहे. देशातील आयात होणारा ५० टक्के कोळसा एकट्या इंडोनेशियातून येतो.

निकेलचेही भांडार : इंडोनेशिया कोळशाव्यतिरिक्त निकेलचाही मोठा उत्पादक आहे. निकेलचा वापर स्टेनलेस स्टीलच्या निर्मित होतो. अमेरिका त्याचा सर्वात मोठा आयातदार आहे. त्याशिवाय कॅनडा, नॉर्वे, फिनलंड, आॅस्ट्रेलियातही ते आढळून येते.

24 टक्के भाग जगातील एकूण निकेल इंडोनेशियात 40 हजार कोटींचे निकेल टेस्ला इंडोनेशियातून खरेदी करणार, ईव्ही बॅटरीसाठी वापर. 10 वर्षांपूर्वी २.२ कोटी टन निकेल उत्पादन, आता १० टक्के राहिले

बातम्या आणखी आहेत...