आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नमाजदरम्यान स्फोट, 100 जणांचा मृत्यू:आयएसने अफगाणिस्तानातील मशिदीवरील फिदाईन हल्ल्याची घेतली जबाबदारी, म्हणाले- आम्ही शियांना लक्ष्य केले

काबुल17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयएसने जबाबदारी घेतली, म्हणाले- शिया मुस्लिम आमच्या निशाण्यावर

अफगाणिस्तानच्या कुंदुझमध्ये शुक्रवारच्या नमाज दरम्यान मोठा स्फोट झाला. यामध्ये 100 लोक मरण पावले आणि अनेक जखमी झाले. हा स्फोट हजारा शिया मशिदीला निशाणा बनवून घडवण्यात आला. कुंदुज सेंट्रल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की आतापर्यंत आम्हाला हॉस्पिटलमध्ये 35 मृतदेह सापडले आहेत आणि 50 हून अधिक जखमींना दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर (MSF) द्वारे चालवल्या जाणाऱ्या दुसऱ्या रुग्णालयात 15 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. आयएस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन झाल्यावर हा देशातील सर्वात मोठा हल्ला आहे. कुंदुजमधील संस्कृती आणि माहिती संचालक मतिउल्लाह रौहानी म्हणाले की, हा आत्मघातकी हल्ला होता, तर तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की कुंदुजमधील मशिदीतील स्फोटात अनेक लोक मारले गेले आहेत. मात्र, मृतांची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही.

आयएसने जबाबदारी घेतली, म्हणाले- शिया मुस्लिम आमच्या निशाण्यावर
इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने फिदाईन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने म्हटले की, आमचे लक्ष्य शिया मुस्लिम आणि त्यांच्या धार्मिक संस्था आहेत. आयएसशी संबंधित आमक वृत्तसंस्थेच्या हवाल्याने साइट इंटेलिजन्स ग्रुपने याची पुष्टी केली आहे.

हल्ल्याच्या वेळी मशिदीत सुमारे 300 लोक होते
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्याच्या वेळी मशिदीत सुमारे 300 लोक उपस्थित होते. हे लोक शुक्रवारच्या प्रार्थनेला उपस्थित राहण्यासाठी आले होते. साक्षीदारांनी सांगितले की त्यांनी प्रार्थना करत असताना स्फोटाचा आवाज ऐकला. घटनास्थळी आरडाओरडा झाला आणि लोक इकडे तिकडे पळू लागले.

ISIS-खुरासान गट या हल्ल्यामागे असल्याचा संशय आहे
अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तथापि, तालिबानचे प्रतिस्पर्धी गट अलीकडच्या काळात अशा हल्ल्यांच्या मागे आहेत. या स्फोटामागे अफगाणिस्तानात कार्यरत इसिस-खोरासन गट असू शकतो, असे मानले जाते. इसिस शिया मुस्लिमांना विरोध करत आहे. त्याचबरोबर त्याला हजारा आणि इतर अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचाही विरोध आहे.

बातम्या आणखी आहेत...