आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Is It Not The Government's Job To Hear The Case Of A Person Who Lost His Job Due To Vaccination? Question Of Kerala High Court

कोची:लसीमुळे नोकरी गेलेल्या व्यक्तीची कैफियत ऐकणे सरकारचे काम नाही? केरळ हायकोर्टाचा प्रश्न

कोची19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारकडून दिल्या जाणाऱ्या लसीमुळे एखाद्याला नोकरी गमावण्याची वेळ येत असल्यास त्याचे म्हणणे ऐकणे सरकारचे कर्तव्य नाही का, अशी विचारणा केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्राला केली. या प्रकरणातील याचिकेवर सरकारकडून उत्तरही मागवण्यात आले आहे. व्यक्तीला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेल्या लसीचा तिसरा डोस घेण्याची परवानगी दिली जावी, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे. तिसरा डोस घेतल्यानंतर या व्यक्तीला सौदी अरेबियाला जाता येऊ शकेल. कारण ही व्यक्ती सौदी वेल्डर म्हणून काम करत होती.सौदी अरेबियात कोरोनापासून बचावासाठी कोव्हॅक्सिनच्या दोन डोसला मंजुरी नाही. म्हणूनच याचिकाकर्त्याला सौदीला जाण्याची परवानगी मिळू शकत नाही. अखेर याचिकाकर्त्याने तिसरा डोस मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली.

न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीकृष्णन म्हणाले, आम्ही केंद्र सरकारवर दोषारोप करत नाही, परंतु सरकारने दिलेल्या लसीमुळे एखाद्या व्यक्तीवर नोकरी गमावण्याची वेळ यावी, प्रवासावर बंदी आणली जावी या गोष्टी मूलभूत अधिकारांचे हनन आहे. केंद्र सरकारच्या वतीने भूमिका मांडणाऱ्या सहायक सॉलिसिटर जनरल मनू एस यांना निर्देश दिले. सौदी अरेबियात कोव्हॅक्सिनच्या लसीला अद्याप मंजुरी का नाही, याचा शोध घ्यावा. वास्तविक जागतिक आरोग्य संघटनेने त्यास मंजुरी दिली आहे. महामारीत प्राण वाचवण्यास प्राधान्य होते. तोपर्यंत केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय मान्यतेची प्रतीक्षा करू शकत नव्हते.

बातम्या आणखी आहेत...